एक्स्प्लोर

महापरीक्षा पोर्टल तात्काळ बंद करावं, रोहित पवारांची विधानसभेत मागणी

एमपीएससीच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जाव्यात, कारण महापोर्टलमध्ये प्रचंड घोळ आहे, रोहित पवारांनी विधानसभेत सांगितलं.

नागपूर : महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा बंद करुन महापोर्टलही तात्काळ बंद करावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी महापोर्टलला स्थगिती दिली असली तरी महापोर्टलही तात्काळ बंद करावे, अशी मागणी रोहित पवारांनी केली. मुख्यमंत्र्यांनी महापोर्टलला स्थगिती दिली त्याबद्दलही त्यांनी आभार मानले. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, तोपर्यंत महापोर्टलला स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

महापोर्टल बंद करा आणि परीक्षा पद्धतही बंद करावी. एमपीएससीच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जाव्यात, कारण महापोर्टलमध्ये प्रचंड घोळ आहे. महापोर्टलचं ज्या कंपनीला कंत्राट दिलं आहे, त्याच्या शासन आदेश आणि निविदेत मोठी तफावत आहे, अशी माहितीही रोहित पवार यांनी सभागृहात दिली.

महापोर्टलने घेतलेल्या परीक्षेदरम्यानची सीसीटीव्ही फुटेज टेप मिळत नाही. वनविभागाच्या परीक्षेत उमेदवारांची शारीरिक क्षमता न बघता केवळ लेखी परीक्षेद्वारे नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे या पोर्टलचा कारभार योग्यरित्या सुरु नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत एक बैठक बोलवावी व तात्काळ याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

राज्य सरकारतर्फे शासकीय नोकरभरतीसाठी सुरु करण्यात आलेले 'महापोर्टल' बंद करण्याची मागणी याआधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत वेगळा विभाग निर्माण करावा, असंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं होतं.

महायुती सरकारच्या काळात ही महापोर्टल सेवा सुरु करण्यात आली होती. राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांनी महापोर्टलविषयी सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केली होती. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये लक्षणीय आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महापोर्टलविरोधात आंदोलनं झाली आहेत. मागील सरकारने सुरु केलेले हे महापोर्टल बंद करुन पूर्वीप्रमाणेच नोकर भरतीसाठी परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी निवेदनाद्वारे केली होती.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर

Embed widget