LIVE BLOG | सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीरमधून अनेकांनी बस्तान हलवलं
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
10 Mar 2019 10:06 AM
लातूर एमआयडीसीवर पाणीसंकट, पाणीकपात सुरू
740 उद्योग अडचणीत, तीस हजारपेक्षा जास्त कामगारांवर बेरोजगारीची वेळ
740 उद्योग अडचणीत, तीस हजारपेक्षा जास्त कामगारांवर बेरोजगारीची वेळ
पालघर : पालघर लोकसभेची जागा भाजपने शिवसेनेसाठी सोडल्याचे कळताच अनेक विक्रमगड विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांनी आपले राजीनाम्याचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार पास्कल धनारे यांच्याकडे दिली आहेत.
मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे शिवछत्रपती जीवनगौरवनं सन्मानित; प्रियंका मोहिते, स्मृती मानधना, उत्कर्ष काळे, रेश्मा मानेसह 88 जणांना छत्रपती पुरस्कार
सांगली : सरकारी नोकऱ्यांची कल्पना डोक्यातुन काढून टाका, यापुढे सरकारी नोकऱ्या मिळणे अवघड : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे रोजगार मेळाव्यात उद्गार
मुंबई-आग्रा महामार्गावर संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास नाशिककडे जात असलेल्या एका कारला अचानक आग लागल्याने कार जळून खाक झाली. महामार्गावरील आडगाव टप्पा येथे ही घटना घडली.
परभणी: 50 शेळ्यांना पाण्यातून विषबाधा, विषबाधेने 27 शेळ्यांचा मृत्यू 23 शेळ्यांवर उपचार सुरू, मानवत तालुक्यातील सोमठाणा येथील घटना
औरंगाबाद : बेगमपुरा भागात विवाहितेने 3 वर्षीय मुलीला गळफास देत स्वतः आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचं कारण अद्याप समजू शकले नाही .
चंद्रपूर: शहरातील सरकारनगर भागात अपार्टमेंटमधील देहव्यापार व्यवसायाचा पर्दाफाश, पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 5 महिलांसह मुख्य सूत्रधार महिलेसह मुलाला अटक
VIDEO : सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीरमधून अनेकांनी बस्तान हलवलं
बारामती पोलिसांची शोकसभेसाठी परवानगी घेण्यासाठी आलेल्या जवानाला पोलिस ठाण्याच्या आवारातच मारहाण, वर्दीवरील जवानाला ठोकल्या बेड्या
मुंबई : पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ गोरेगाव फिल्मसिटी बंद, दुपारी 2 ते 4 दरम्यान फिल्मसिटी बंद राहणार
वंदे भारत एक्स्प्रेसची सुविधा आजपासून सुरु, पुढील दोन आठवड्यांचे तिकीट आधीच विकले गेले
पुलवामामधील हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबाला कोल्हापूर पोलीस दल करणार 30 लाखांची मदत
मित्राच्या प्रेम प्रकरणाचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या युवासेना तालुका अध्यक्षाची हत्या, सांगलीतील घटना
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 दरम्यान मेगाब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर जलद मार्गावर बोरिवली-अंधेरीदरम्यान मेगाब्लॉक, हार्बर रेल्वेवर कुर्ला-वाशीदरम्यान अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉग, रेल्वे रुळ आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक
कोल्हापूर : दुकानासमोर थुंकण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, दगड आणि काचेच्या बाटल्यानी केला हल्ला, बागल चौकातील प्रकार
पार्श्वभूमी
- पुलवामात वापरलेल्या 200 किलो स्फोटकांचा बदला 200 टक्के आयात शुल्काने, पाकिस्तानी वस्तूंवर आता थेट 200 टक्के आयातशुल्क, अर्थमंत्र्यांची घोषणा
- एलओसीवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, नौशेरा सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार, आयईडी स्फोटात सेनेचा एक अधिकारी शहीद
- विदर्भानं इराणी करंडकासह भारतीय नागरिकांची मनंही जिंकली; इनामाची सारी रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या निधीला समर्पित
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -