Yoga for beginners : आज 21 जून रोजी जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योगा दिवस(International Yoga Day 2022) साजरा केला जात आहे. सध्याच्या काळात शरीर आणि मनाचे संतुलन नीट ठेवण्यासाठी नियमित योग, व्यायाम केला जातो. योग केल्याने शरीर आणि मनाला अनेक फायदे मिळतात. तुम्हालाही योगा करायचा तर आहे परंतु याची सुरुवात नेमकी करावी हे कळत नसेल तर, या संदर्भात मेडिकल एडिटर आणि कंटेंट स्पेशलिस्ट डॉ. स्वाती मिश्रा यांनी योगाची सुरुवात कशी करावी, सुरुवातीला कोणती आसनं करावीत याविषयी काही टिप्स दिल्या आहेत. त्या कोणत्या हे जाणून घ्या.
योगाची सुरुवात करणाऱ्या लोकांसाठी काही महत्त्वाची आसने :
1. ताडासन
ताडासन हे आसन तुमचा तणाव दूर करण्यासाठी तसेच तुमच्या मेंदूला शांत करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तसेच या आसनामुळे शरीरावर तुमचा तोलही नीट राहतो.
कसे कराल?
एका जागेवर दोन पायांवर ताठ उभे राहा. समोरच्या दिशेने पाहा. त्यानंतर दोन्ही हात हळूहळू वर घ्या. आणि एकमेकांना जोडा. हे करत असताना कानाला टच करून खांदे वर करा. डोकं सरळ ठेवा. आसना दरम्यान 15-20 वेळा दिर्घ श्वास घ्या.
हे टाळा :
जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल, चक्कर येत असेल तर हे आसन करणे टाळा.
2. बालासन
या आसनाने तुमचा फक्त तणाव आणि थकवाच दूर होत नाही तर तुमची पचनशक्ती, तुमच्या वेदना, आणि तुमच्या गुढग्यावरचाही ताण कमी होतो.
कसे कराल?
पायाला वाकवून टाचांवर बसा. त्यानंतर हळूहळू डोकं जमिनीला टेकवा. लक्षात ठेवा तुमचं नाक हे जमिनीला टच झाले पाहिजे. 5 ते 10 वेळा दिर्घ श्वास घ्या.
हे टाळा :
जर तुम्हाला अतिसार किंवा हृदयाशी संबंधित काही समस्या असतील तर हे आसन करणे टाळा.
3. विपरित करणी
या आसनामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते. तसेच तुमच्या थकलेल्या पायांना आराम देते. तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढवते.
कसे कराल?
भिंतीच्या कोणत्याही बाजूने झोपा. तुमचे पाय भिंतीच्या समोर करा. हळूहळू पाय भिंतीच्या समोर करा. हे करत असताना पाय ताठ ठेवा. 2-3 मिनीटांपर्यंत ही पोझ अशीच ठेवा आणि नॉर्मल श्वास घ्या. त्यानंतर हळूहळू पूर्वावस्थेत या.
हे टाळा :
जसे तुम्हाला माहित आहे की ही उलथापालथीची पोझ आहे. त्यामुळे महिलांनी मासिक पाळीच्या दरम्यान हे आसन करू नयो. तसेच ज्या लोकांना मानेचा आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये.
4. अधोमुख शवासन
या आसनामुळे तुमची हाडे, सांधे आणि खांदे मजबूत होतात. तसेच यामुळे तुमचं डोकं शांत राहतं.
कसे कराल?
तुमच्या शरीराला खालच्या बाजूने झोकून द्या. तुमचे तळवे आणि गुडघ्यांवर सगळा ताण येईल. हळूहळू स्ट्रेच करा. 5 वेळा मोजा आणि पुन्हा पूर्वावस्थेत या.
हे टाळा :
ज्या व्यक्तींना हायपरटेन्शन, डोळ्यांचा त्रास, अतिसार, खांद्यांचे दुखणे, मानदुखीचा त्रास आहे त्यांना हे आसन करू नये.
महत्वाच्या बातम्या :