Team India: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना क्रिडाविश्वातील सर्वात मोठा सामना मानला जातो. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उस्तुकता पाहायला मिळते. भारत- पाकिस्तान यांच्यातील सामना सुरु असताना दोन्ही देशातील खेळाडूंमध्ये अनेकदा वाद पाहायला मिळाला. परंतु, क्रिकेट विश्वात भारतचं वर्चस्व असल्याचा दावा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीनं (Shahid Afridi) केला आहे. क्रिकेटविश्वात भारताचा दबदबा कसा? या मागचं कारणही आफ्रिदीनं सांगितलं आहे. 


भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा नुकतीच पार पडली. टी-20 विश्वचषक विजेता खेळाडू आफ्रिदी म्हणाला की, दिर्घ कालावधीत खेळली जाणारी आयपीएलच्या स्पर्धेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि पाकिस्तानच्या एफटीपी कार्यक्रमावर परिणाम होत असल्याचं त्यानं म्हटलंय. कारण त्यावेळीच पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळलं जातं. 


शाहिद आफ्रिदी स्थानिक मीडिया चॅनलवर बोलताना म्हणाला, "हे सर्व बाजार आणि अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. भारत सर्वात मोठी क्रिकेटची बाजारपेठ भारत आहे. ते जे म्हणतील ते होईल." आम्ही तुम्हाला सांगतो की आयपीएलच्या पाच वर्षांचे मीडिया हक्क $ 6.02 अब्ज (48,390 कोटी रुपये) मध्ये विकले गेले. जगातील सर्वात महागड्या क्रीडा लीगमध्ये आयपीएल दुसऱ्या क्रमांकावर आहे.


टी-20 विश्वचषका 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ आमने सामने आले होते. या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघानं भारतला पराभूत करून गेल्या अनेक वर्षाचा विक्रम मोडलाय.विश्वचषक स्पर्धेत भारताला पराभूत करणारा बाबर आझम पहिला पाकिस्तानचा खेळाडू ठरलाय.  येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये आगामी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषकात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचा संघ एकमेकांशी भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आगामी टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत उतरणार आहे.


हे देखील वाचा- 


Carlos Brathwaite: आधी फलंदाजाला चेंडू मारला, त्यानंतर पंचाशी भिडला; कार्लोस ब्रॅथवेटचा व्हिडिओ व्हायरल


IND vs ENG: विराटसाठी इग्लंड दौरा खडतर! खराब फॉर्म अन् ॲंडरसनची भेदक गोलंदाजी, कोहलीसमोर पाच मोठे आव्हान


IND vs ENG: बर्मिंगहॅम कसोटीपूर्वी भारताच्या अडचणी वाढल्या, रविचंद्रन अश्विन कोरोना पॉझिटिव्ह