Year Ender 2022 : 2023 हे नवं वर्ष सुरु व्हायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. 2022 हे वर्ष अनेक कारणांनी लक्षात राहील. याचं कारण म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण जग त्रस्त होतं. अनेकांच्या त्यामुळे नोकऱ्या गेल्या होत्या. कोरोना संपत नाही तोपर्यंत जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे सर्दी, खोकला, सर्दी यांसारख्या आजारांनीही लोकांना त्रास दिला. कोरोना महामारीत अनेक लोकांना शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही त्रास सहन करावे लागले. त्यामुळे गुगलवर या आजारांचा सर्वाधिक शोध घेण्यात आला. याबरोबरच त्यांच्या घरगुती उपचारांचाही शोध घेण्यात आला. या वर्षी इंटरनेटवर सर्वात जास्त शोधलेल्या आजारांबद्दल जाणून घेऊयात.


वजन कमी करण्याचा मार्ग : लॉकडाऊननंतर ज्या प्रकारे लोकांचे वजन वाढले, त्यामुळे अनेक समस्या वाढल्या. लोकांनी गुगलवर वजन कमी करण्याच्या टिप्स शोधल्या. काहींनी सकस आहार घेण्यास सुरुवात केली. तर, काहींनी व्यायाम तर काहींनी योगा करण्यास प्राधान्य दिले.
 
रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी टिप्स : कोरोना काळात अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली होती. आणि त्यामुळे लोकांनी गुगलवर इम्युनिटी बूस्टिंग टिप्स शोधल्या. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुगलवर अनेक गोष्टींचा शोध घेतला गेला जसे की रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर फळे, भाज्या कोणत्या असे अनेक उपाय शोधले.
 
सर्दी दूर करण्यासाठी उपाय : बदलत्या वातावरणानुसार अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रासही खूप होऊ लागला. त्यामुळे लोकांनी इंटरनेटवर याबद्दल बरीच माहिती गोळा केली. तसेच, सर्दी, खोकला टाळण्यासाठी मार्ग आणि उपाय कोणते हे देखील शोधले जात होते. 


कोरोना टाळण्याचे मार्ग : कोरोना महामारीने लोक ज्याप्रकारे त्रस्त झाले होते. त्यामुळे लोकांमध्ये या आजाराबद्दल एक दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे या दरम्यान लोकांनी गुगलवर कोरोना टाळण्याचे मार्ग शोधले. सॅनिटायझेशनपासून ते व्हेंटिलेटर आणि मेडिटेशनपर्यंत अशा अनेक गोष्टी गुगलद्वारे सर्च करण्यात आल्या.
 
बद्धकोष्ठता दूर करण्याचे मार्ग : कोरोना काळात लोकांनी अधिक काळ घरात स्पेन्ड केला. त्यामुळे शरीराला एक प्रकारे आळस लागला होता. या दरम्या लोकांची जीवनशैली बदलली, जेवणाची वेळ बदलली आणि मानसिक दबाव वाढत गेला. याचा परिणाम म्हणून बद्धकोष्टतेचा त्रासदेखील अनेकांना सुरु झाला. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल