Kiwi Benefits for Bones : थंडीच्या दिवसांत प्रत्येकजण स्वतःची विशेष काळजी घेतो. थंडी टाळणे, गरम असलेले पदार्थ खाणे, हिवाळ्यात या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. थंड वातावरणात तळलेले अन्न खाल्ल्याने शरीराला अपाय होतो. याबरोबरच बाहेरचे तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. चेहऱ्यावर पिंपल्स, डाग दिसू लागतात. म्हणूनच शरीराला निरोगी ठेवणाऱ्या गोष्टी प्रत्येक ऋतूत खाल्ल्या पाहिजेत, मग तो हिवाळा असो किंवा उन्हाळा. फळांबद्दल बोलायचे झाले तर, किवी खाल्ल्याने तुमची त्वचा तर सुधारतेच, याशिवाय किवी खाल्ल्याने हाडे देखील मजबूत होतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला हाडांसाठी किवी हे फळ किती चांगलं आहे हे सांगणार आहोत.
थंडीमध्ये हाडं खूप मजबूत राहतील
हिवाळ्यात आपल्या हाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी पोषक तत्वे घेणे आवश्यक आहे. किवीमध्ये सर्वाधिक फायटोकेमिकल्स आणि व्हिटॅमिन सी असते. त्वचेसाठी ते खूप फायदेशीर आहे. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा डॉक्टर देखील किवी खाण्याचा सल्ला देतात. किवी खाल्ल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचीच हाडे मजबूत होतात. म्हणूनच हिवाळ्यात हे फळ तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी खूप गुणकारी मानले जाते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबासारखी समस्या आहे त्यांनी दिवसातून दोन ते तीन वेळा किवी फळाचे सेवन करावे.
किवीमध्ये भरपूर जीवनसत्त्व असतात
हे फळ असे आहे की त्यात भरपूर जीवनसत्त्व असतात. म्हणूनच किवीला जीवनसत्त्व आणि पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. हे खाल्ल्याने माणसाची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. हे फळ थोडे महाग असल्याने अनेक लोक याची खरेदी करणे टाळतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की हे फळ तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते. किवी हा रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा चांगला पर्याय मानला जातो. तसेच हिवाळ्यात दुखापत झाल्यास किंवा इतर कोणत्याही जखमा लवकर भरून येत नसतील तर यासाठी किवी खाल्ल्यास जखम लवकर भरते. किवीमधील नैसर्गिक संयुगे आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी उपयोगी ठरतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :