Tea For Changing Weather : बहुतेक लोकांना त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने करायला आवडते. कारण चहा (Tea) तुमच्या शरीराला आणि मनाला नवी ऊर्जा देतो. हे प्रामुख्याने चहामध्ये आढळणाऱ्या कॅफिनमुळे होते. जरी बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात दुधाच्या चहाने करतात. पण गुलाबी थंडीसाठी या ठिकाणी आम्ही तुम्हाला दोन चहाचे प्रकार सांगणार आहोत. जे तुमचा थंडीत होणाऱ्या व्हायरलपासूनदेखील तुमचे संरक्षण करण्यास मदत करतील.


हळूहळू हिवाळा ऋतूला सुरुवात झाली आहे. या दरम्यान वातावरणात अनेक बदल होताना दिसतात. त्याचबरोबर शरीरात देखील अनेक समस्या निर्माण होतात. मात्र, हिवाळ्यापूर्वी वातावरणात वाहू लागतात ते गुलाबी थंडीचे वारे. गुलाबी थंडी म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला थंडी जाणवत नाही आणि उष्णता तुम्हाला त्रास देत नाही. ऑक्टोबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ते मार्च महिन्याचा काळ असा गुलाबी थंडीसाठी ओळखला जातो. मात्र, हाच काळ सर्दी, कफ, विषाणू यांसारख्या आजारांनी लोकांना ग्रासले आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही चहाची मदत घेऊ शकता.  


सौम्य सर्दीसाठी सर्वोत्तम चहा कोणता?


गुलाबी थंडीत, तुमच्या दिवसाची सुरुवात या दोन चहाने करा.



  • लवंग आणि आल्याचा चहा 

  • ग्रीन टी म्हणजे दूध आणि साखरेशिवाय हिरव्या पानांपासून तयार केलेला चहा


हा चहा चांगला कसा?



  • लवंग आणि आल्यापासून तयार केलेला चहा आणि ग्रीन टी या दोन्हीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यांच्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात, जे शरीरात जळजळ होण्याची समस्या होऊ देत नाहीत. जी बदलत्या ऋतूंमध्ये एक सामान्य समस्या आहे.

  • अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांचा फायदा असा आहे की, बदलत्या ऋतूमध्ये बॅक्टेरिया खूप सक्रिय असतात आणि सर्दी, खोकला, व्हायरल यांसारखे बहुतेक संसर्गजन्य रोग पसरवतात. या चहाच्या सेवनाने या आजारांपासून बचाव होतो.

  • जर तुम्ही दुधापासून बनवलेल्या चहाचे शौकीन असाल तर चहामध्ये लवंग आणि आल्याचा समावेश करा. यामुळे चहाची चवही वाढेल आणि आजारही दूर राहतील.

  • जर तुम्हाला काळा चहा प्यायला आवडत असेल तर लवंग आणि आल्याचा चहा बनवताना त्यात दूध घालू नका. चव वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या कपमध्ये लिंबाच्या रसाचे एक ते दोन थेंब टाकू शकता.

  • जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ग्रीन टीचे सेवन करा. सुगंध आणि गुणधर्म असलेला हा साखरमुक्त चहा तुमचे आरोग्य आणि मूड दोन्हीही निरोगी ठेवण्यास मदत करेल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : शरीरात लोहाची कमतरता असल्यास 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा; हिमोग्लोबिन वाढण्यास होईल मदत