World Physiotherapy Day 2024: अनेकांमध्ये तिशीनंतर सुरु होणारा कंबरदुखीचा त्रास हळूहळू वाढत जाऊन उठण्याबसण्यास होणारी कुरबुर वाढते. मग पेनकिलर घेऊन स्प्रे मारून आराम मिळण्याची नानाविध उपाय केले जातात. पण बसण्या उठण्याची चूकीची पद्धत, व्यायामाचा अभाव आणि आहारातून योग्य पोषण न मिळणं यामुळं हाडांची झीज होऊ लागते. तिशीनंतर अनेकांना कंबरदुखी सुरु होते. दिवसभर  काम करुन अंग टाकलं की अधिकच होणारा त्रास कमी करण्यासाठी नेमकं करायचं काय?


वर्ल्ड कॉन्फडरेशन ऑफ फिजिओथेरपीनुसार जगभरात ६०० दशलक्ष हून अधिक लोकांना कंबरदुखीचा त्रास आहे. ही कंबरदुखीची समस्या २०५० पर्यंत ८०० दशलक्ष झाली असेल असा अंदाज आहे. दर 13 व्यक्तींपैकी एकाला कंबरदुखीची समस्या असते. या बॅकपेनसाठी काय इलाज आहे?


खोबरेल तेलाने कंबरेला मसाज करा


कंबरदुखी अधिक जाणवत असेल तर त्यावर खोबरेल तेलात थोडा कापूर टाकून गरम तेल कंबरेवर चोळल्यानं दुखण्यावर आराम मिळतो. किंवा गरम पाण्याने स्नान केल्यानंही  कंबरेला शेकल्यास आराम पडू शकतो.


कंबरेला आराम देण्यासाठी झोपताना..


बेडवर अंग टाकताच प्रचंड वेदना होत असतील तर यासाठी एक पातळ नॅपकीन किंवा टॉवेलची गुंडाळी बेडवर ठेऊन त्यावर झोपल्यास कंबरेच्या खालच्या भागाला आराम पडतो.


ब्लड टेस्ट करून घ्या


कंबरदुखी वारंवार होत असेल तर एकदा ब्लड टेस्ट करून रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण तसेच व्हिटॅमिन डी ३ चं प्रमाण तपासून घ्या. या दोन घटकांची कमतरता असेल तरीही कायमच कंबरदुखीचा त्रास होतो. त्यासाठी आहारात दुग्धजन्य पदार्थ, केळी, सुकामेवा, डाळी, पालेभाज्या यांचं प्रमाण वाढवा.


उभे राहताना हे टाळा


उभे राहताना अनेक जणांना एका पायावर शरीराचा भार देऊन उभे राहण्याची सवय असते. कधी एका पायावर तर कधी दुसऱ्या पायावर ते भार टाकतात. खूपच क्वचितवेळा त्यांच्या दोन्ही पायांवर शरीराचा समान भार असतो. असं एका पायावर उभं राहण्याची सवय देखील कंबरदुखीसाठी कारण ठरू शकते. 


हे व्यायाम करण्याचा तज्ञांचा सल्ला


नियमित व्यायमाची सवय असणाऱ्याला बॅकपेन किंवा हाडांचं दुखणं कमी होतं. रोज थोडा थोडा व्यायाम करुनही कंबरदुखी कमी करता येते. यासाठी भुजंगासन, अधोमुख श्वानासन, सेतूबंधासन ही आसने करण्याचा सल्ला देण्यात येतो. पण ही आसने करण्यापूर्वी योगतज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.


हेही वाचा:


Sarcoma : सारकोमा; रक्तामध्ये वेगाने पसरणारा दुर्मिळ आणि जीवघेणा कर्करोग!