महत्त्व
पृथ्वी वाचवण्यात संसाधनांच्या संवर्धनाची महत्त्वाची भूमिका आहे. पाणी, हवा, माती, ऊर्जा, खनिजे, वनस्पति, प्राणी, पक्षी अशा निसर्गाच्या अनेक अंगांचे जतन करून नैसर्गिक सौंदर्याचा समतोल राखता येतो. रशियन विचारवंत लिओ टॉलस्टॉय म्हणतो की, मानव आणि निसर्गामध्ये असलेला सकारात्मक बंध कायम राहणे ही आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वात महत्वाची आणि प्राथमिक गोष्ट आहे. तसेच महात्मा गांधीनीही म्हटलं आहे की, पृथ्वीकडे प्रत्येकाची गरज भागवण्याची क्षमता आहे पण प्रत्येकाची लालसा किंवा लालच भागवण्याची क्षमता नाही.
इतिहास
जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचा इतिहास फारसा कोणाला माहिती नाही. मात्र 28 जुलै हा दिवस दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मानवाने आपल्या सुख सोयीसोयींसाठी निसर्गाच्या केलेल्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा आजचा दिवस आहे. निसर्गाचे आपल्या परिने कसे संवर्धन करता येईल यासाठी एक पाऊल उचलणे, जनजागृती करण्याचे काम आजच्या दिवशी केले जाते. निसर्गाचे संवर्धन न केल्याने माणसांना ग्लोबल वॉर्मिंग, विविध आजार, वातावरणीय बदल, प्राकृतिक बदलांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला चांगले आयुष्य हवे असल्यास आपल्या जवळ असलेल्या सुंदर निसर्गाचे संगोपन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
थीम
World Nature Conservation Day 2023 ची या वर्षीची थीम ही यावेळी अतिशय हटकी आहे. यावर्षीची थीम आहे "The earth is our home" ही असणार आहे.
जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त आपल्या प्रियकरांना द्या हे संदेश
- नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे जग सुंदर आहे, त्यामुळे याचा विचार आपण करायला हवा. त्याच्या रक्षणासाठी आपण पुढे येऊ या. जागतिक निसर्ग दिनाच्या शुभेच्छा!
- तुमचे आरोग्य तुम्ही निसर्गाच्या संपर्कात घालवलेल्या वेळेशी थेट संबंधित आहे, म्हणून निसर्गावर प्रेम करा आणि त्याचे संरक्षण करा. जागतिक निसर्ग दिनाच्या शुभेच्छा
- जर तुम्ही काळजी घेतली आणि पृथ्वीवर प्रेम केले तर ती तुमची अधिक काळजी घेईल. जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या शुभेच्छा!
- पृथ्वीचे जतन केले पाहिजे आणि आपण तिच्या संवर्धनासाठी आपले सर्वोत्तम योगदान दिले पाहिजे. जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या शुभेच्छा!
- आपल्या निसर्गाचे प्रेम आणि जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या शुभेच्छा!
इतर महत्वाच्या बातम्या