Eye Flu of Pink Eye Treatment at Home : देशात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहेत. अनेक राज्यांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे व्हायरल इन्फेक्शनचा (Viral Infection) धोकाही वाढला आहे. अचानक डोळ्याची साथ पसरली आहे. डोळ्यांच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. डोळ्यांच्या साथीची (Conjunctivitis) लक्षणं गंभीर होण्याआधी तुम्ही सोपा घरगुती उपाय करु शकता.


आयुर्वेदिक वैद्य मिहीर खत्री यांच्या मते, आजकाल डोळ्यांची समस्या झपाट्याने वाढत आहे. डोळ्याचा संसर्ग टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपाय करता येईल. या उपायाने डोळ्यांचे विकारही टाळता येतात, असं त्यांनी सांगितलं आहे.


डोळ्याच्या संसर्गाची लक्षणे कोणती?


देशभरातील अनेक राज्यातील विविध जिल्ह्यात डोळ्याच्या साथीने शिरकाव केला आहे. लहान मुलांसह वृद्धांनाही संसर्गजन्य आजाराची लागण होत आहे. डोळ्यात पाणी येणं, डोळ्यातून पिवळी घाण येणं, डोळे लाल होणं, डोळ्यांवर सूज येणं, डोळ्यांची जळजळ होणं ही डोळ्याच्या आजाराची लक्षणे आहेत.





डोळ्यांच्या संसर्गासाठी रामबाण उपाय








रोज करा 'हे' काम 


पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनचा धोका खूप जास्त असतो. इतर संसर्गा प्रमाणे डोळ्यांचा संसर्गही या काळात वाढतो. वैद्य मिहीर खत्री यांच्या मते, या समस्येवर त्रिफळा उत्तम पर्याय आहे. त्रिफळाच्या रसाने डोळे धुणे फायदेशीर आहे. 


त्रिफळा चूर्णाने डोळे कसे धुवावेत?



  • तुम्हाला 10 ग्रॅम त्रिफळा किंवा त्रिफळा पावडर घ्या.

  • हे 250 मिली पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.

  • सकाळी हे पाणी 10 मिनिटे उकळून गाळून घ्या.

  • या पाण्याने डोळे स्वच्छ धुवा.


त्रिफळाने डोळे धुण्याचे फायदे


आयुर्वेदनुसार, त्रिफळाने नियमित डोळे धुतल्याने डोळ्यांचा संसर्ग किंवा इतर डोळ्यांसंबंधित विकार दूर होतात आणि डोळ्यांची सूज, वेदना, लालसरपणा आणि खाज कमी होते. यामुळे दृष्टीही सुधारू शकते.






टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sabudana : साबुदाणा खाणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? तज्ज्ञांचं मत जाणून घ्या