Sanju Samson : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याला सुरुवात झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याने काइल मायर्स याला बाद करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. पण ट्विटरवर टीम इंडिया आणि बीसीसीआयला ट्रोल करण्यात येत आहे. संजू सॅमसन याला संधी न दिल्यामुळे चाहत्यांचा पार चढला आहे. रोहित शर्माने प्लेईंग 11 मध्ये विकेटकीपर म्हणून ईशान किशन याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले. संजूला स्थान न मिळाल्यामुळे भारतीय चाहत्यांचा पारा चढला. संजूच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केलाय. 'Justice for Sanju'असे ट्वीट काही जणांनी केले आहेत. तर काहींनी आम्ही संजूसोबत आहोत.. असेही म्हटलेय. त्यातच या सामन्यात सूर्यकुमार यादव संजूची जर्सी घालून मैदाना उतरलाय, त्यावरुनही लोकांनी ट्रोल केलेय. 


सोशल मीडियावर संजू सॅमसन ट्रेंड करत असून अनेकांनी बीसीसीआयवर टीका केली आहे. संजूला संधी कधी मिळणार ? संजूकडे वशिला नाही.. इशान किशनला का संधी दिली? यासारखे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


पाहा नेटकरी काय म्हणाले.....










































संजू सॅमसनची वनडे मधील कामगिरी - 


विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याला आतापर्यंत तितकी संधी मिळाली नाही. त्याला प्लेईंग 11 ऐवजी बाकावरच जास्त काळ बसवण्यात आलेय. संजू सॅमसन याने भारतासाठी आतापर्यंत 11 वनडे सामन्यात प्रतिनिधित्व केलेय, यामधील 10 सामन्यात 66 च्या सरासरीने 330 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 86 इतकी आहे. 


संजूचे पदार्पण कधी ?


23 जुलै 2021 रोजी श्रीलंकाविरोधात संजू सॅमसन याने पदार्पण केले होते. त्याने अखेरचा सामना 25 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंडविरोधात खेळला. म्हणजे मागील 3 वर्षांमध्ये संजू सॅमसन फक्त 11 वनडे सामने खेळला आहे.