World Bicycle Day : शरीराला तंदुरूस्त ठेवण्यासाठी फिजिकल अॅक्टिविटी (Physical Activity) दररोज करणं खूप महत्वाचे आहे. रोजच्या आयुष्यात व्यस्त दैनंदिनीमुळे अनेक जणांकडून फिजिकल अॅक्टिविटी केलीच जात नाही. परिणामी बरेच गंभीर आजार मागे लागातात. मात्र तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर  दररोज फक्त काही मिनिटे सायकल चालवा. याने तुमच्या शरीराला खूप फायदे होऊ शकतात. अनेक गंभीर आजार दूर होण्यास मदत होते. त्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर, श्वसन प्रक्रियेवर होतो. सायकलिंगमुळे संपूर्ण शरीराची एक्सरसाइज  होते. शरीराचा एक एक भाग तंदुरूस्त होतो. आज जागतिक सायकल दिवसानिमित्त काय आहेत सायकल चालवण्याचे फायदे


वजन कमी होत (Weight Loss)


सायकल चालवणे ही एक उत्तम  एक्सरसाइज (Exercise) आहे. जिममध्ये जाऊन तुम्हाला एक्सरसाइज करणे शक्य नसेल तर सायकल हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. या  एक्सरसाइजमुळे पोटाच्या आणि मांडीच्या भागात जमा झालेली चरबी (Fat) कमी होऊ शकते. दररोज अर्धा तास सायकल चालवणे तुमच्या शरीरात अनेक बदल घडवून आणू शकतात. जवळपास 300 किलो कॅलरी (Calories) बर्न होऊ शकते. 1 तास सायकल चालवल्याने 500  कॅलरी बर्न होतात. 


हृदय आणि फुफ्फुसकरीता उपयुक्त 


सायकलिंग एक उत्तम कार्डियो वर्कआउट (Cardio Workout) आहे. ज्याचा हृदय आणि फुफ्फुसकरीता फायदा होतो. तसेच शरीरातील ब्लड सरक्युलेशन (Blood Circulation) सुधारते. सायकल चालवताना तुमच्या हृदयाचा हार्ट रेट (HEart Rate) वाढतो. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते. श्नसनाचे प्रमाणही नियंत्रित राहण्यास मदत होते.


स्नायू मजबूत होतात (Strong Muscles)


सायकलिंगमुळे(Cycling) स्नायू मजबूत होण्यार मदत होते. सायकल चालवताना पायांची वर-खाली हालचाल होत असल्याने पायाचे स्नायू मजबूत होतात. ज्यामुळे शरीरातील ऑक्सीजन (Oxygen) वाढण्यास मदत होते. 


मानसिक स्वास्थ्य चांगले राहते (Good Mental Health)


दररोज सायकलिंगमुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. डिप्रेशन (Depression),  चिंता आणि तणाव कमी होण्यास मदत होते. जास्त हालचाल होत असल्याकारणाने रक्त पुरवठा भरपूर होतो आणि परिणामी  तणाव कमी होतो. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Dr. Tatyarao Lahane: डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह सर्वच डॉक्टरांचे राजीनामा मंजूर, त्या ठिकाणी तात्काळ नवीन नियुक्तीचे राज्य सरकारचे आदेश 


Nashik Sanjay Raut : मी वन मॅन आर्मी असून सुरक्षेची गरज नाही, ज्यांनी बेईमानी केली, सुरक्षा त्यांना द्या, संजय राऊतांचे खडे बोल