Women Health : टिव्ही मालिकेतील अभिनेत्री हिना खान हिने तिला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती सोशल मीडीयावर दिली, आणि सर्वांना आश्चर्यचकित केले, त्यानंतर महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाबद्दल विशेष जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे, कारण अनेक महिलांना याबद्दल योग्य माहिती नाही, ज्याचा परिणाम म्हणून महिला स्वत:ची काळजी घेत नाही. अनेक महिला अशा आहेत, ज्या लाजेखातर या कर्करोगाची तपासणीही करून घेत नाहीत. तर इतर महिलांना या कर्करोगाबाबत अनेक प्रश्न आहेत, ज्यापैकीच एक म्हणजे Breast Cancer एकदा बरा झाल्यानंतर पुन्हा होऊ शकतो का? हा आजार टाळण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी? याबाबत एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार फरिदाबादच्या रेडिएशन आणि ऑन्कोलॉजी आशियाई रुग्णालयाच्या वरिष्ठ सल्लागार डॉक्टर रुची सिंग यांनी माहिती दिली आहे. जाणून घेऊया...



स्तनाचा कर्करोग बरा झाल्यानंतर पुन्हा होऊ शकतो का? डॉक्टर सांगतात..



जगभरात स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि मोठ्या संख्येने मृत्यूही नोंदवले जात आहेत. सामान्य माणूस असो की सेलिब्रिटी, कोणीही यापासून वंचित नाही. विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की, त्यावर उपचारही शक्य आहेत, परंतु अनेक वेळा असे ऐकले जाते की, हा कर्करोग बरा झाल्यानंतरही पुन्हा होतो का? यावर डॉक्टर रुची सिंग सांगतात की हो, पूर्ण उपचारानंतर स्तनाचा कर्करोग परत येऊ शकतो, या आजाराला वैद्यकीय भाषेत रिकरंट कार्सिनोमा म्हणतात, हा आजार बरा झाल्यानंतरच्या पहिल्या 5 वर्षात परत येण्याची शक्यता जास्त असते. 5 ते 20 टक्के प्रकरणांमध्ये हा आजार परत येतो, विशेषत: कौटुंबिक इतिहास किंवा जेनेटिक म्यूटेशन असलेल्या प्रकरणांमध्ये हा आजार पुन्हा येऊ शकतो. लोकल रिकरेन्स, रिजनल रिकरेन्स आणि डिस्टेंस रिकरेन्स अशा अनेक मार्गांनी हा आजार परत येऊ शकतो, जेव्हा स्तनाचा कर्करोग होतो तेव्हा स्तन वाचवून आजूबाजूला झालेला संसर्ग दूर केला जातो, जेव्हा हा आजार स्तनावर येतो तेव्हा त्याला लोकल रिकरेन्स म्हणतात. जर हा आजार जवळपास आढळून आला तर त्याला लोकल रिकरेन्स  म्हणतात आणि जर हा रोग स्तनांव्यतिरिक्त इतरत्र आढळला, जसे की हाड किंवा यकृत, तर त्याला डिस्टेंस रिकरेन्स म्हणतात.


 


हा आजार पुन्हा कोणाला होऊ शकतो?


या आजाराची पुनरावृत्ती अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की रुग्ण उपचाराच्या वेळी कोणत्या अवस्थेत होता, त्याची गाठ 5 सें.मी.पेक्षा जास्त असते का, काखेत गाठ दिसली, आणि जर उपचार योग्य प्रकारे केले गेले नाहीत, तर त्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.



या आजाराची पुनरावृत्ती कशी टाळावी?


नियमित पाठपुरावा करा, 
तुम्ही बरे झाले असाल तरीही तुमचे सर्व रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत 
पण तुम्हाला दोन वर्षांतून दर 3 महिन्यांनी, 5 वर्षांत दर 6 महिन्यांनी डॉक्टरांना भेटावे लागेल, 
डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या आणि उपचार गांभीर्याने घ्यावे लागतील.
याशिवाय संतुलित आहार, शारीरिक हालचाली आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकडे लक्ष दिले पाहिजे.


 


 


हेही वाचा>>>


Women Health : महिलांनो सतर्क राहा! Breast Cancer चे विविध टप्पे माहित आहेत? ते कशाप्रकारे शरीरात पसरतात? लक्षणं जाणून घ्या


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )