Women Health : महिलांनो..सतत दुसऱ्यांची काळजी करत असताना स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. याचे कारण म्हणजे जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर विविध आजारांनी तुम्ही ग्रासले जाल. म्हणून वेळोवेळी शरीरांच्या महत्त्वांच्या अवयवांची तपासणी करणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री हिना खानने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एक दुःखद बातमी शेअर केली होती. ज्यामध्ये तिने सांगितले की, तिला ब्रेस्ट कॅन्सर-3 स्टेज आहे. या बातमीने त्याच्या चाहत्यांपासून ते टीव्ही जगतातील स्टार्सना धक्का बसला. मात्र, याचे निदान झाल्यानंतर काही दिवसांतच तिच्यावर उपचार देखील सुरू झाले. कर्करोग किती गंभीर आहे हे त्याच्या स्टेजवरून म्हणजेच त्याच्या टप्प्यावरून ठरवले जाते. स्तनाच्या कर्करोगाचे वेगवेगळे टप्पे कोणते आहेत? त्याची लक्षणे काय आहेत? ते कशाप्रकारे शरीरात पसरतात? तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या...


 


स्तनाचा कर्करोग म्हणजे काय?


आपल्या शरीरात अनेक पेशी असतात. जेव्हा या पेशी कोणत्याही अवयवामध्ये असाधारणपणे वाढू लागतात तेव्हा कर्करोगाची शक्यता वाढते. स्तनाच्या कर्करोगात, पेशी एक ट्यूमर म्हणजेच गाठ बनवतात, जी गंभीर स्वरुप धारण करते.


 


स्तनाच्या कर्करोगाचे वेगवेगळे टप्पे कोणते आहेत?


कर्करोग किती गंभीर आहे हे त्याच्या स्टेजवरून ठरवले जाते.


स्टेज-1 सौम्य : यामध्ये कर्करोग फक्त स्तनापुरता मर्यादित असतो.


स्टेज-2 मध्यम : यामध्ये कर्करोग स्तनापासून सुरू होतो आणि काखेपर्यंत पसरतो.


स्टेज-3 आणि 4 : ते खूप वेगाने पसरते. जर कर्करोग यकृत, फुफ्फुस किंवा हाडांपर्यंत पोहोचला असेल तर तो स्टेज 4 आहे.


 


त्याची लक्षणं काय आहेत?


-निप्पलमधून रक्तस्त्राव.
-वजन स्थिर राहते, परंतु स्तनाचा आकार वाढतो.
-स्तनामध्ये गाठ जाणवणे. जर वेदना होत नसेल तर ते धोकादायक आहे. वेदना होत असतील तर कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.
-जरी एखादी स्त्री गर्भवती नसली किंवा ती स्तनपान करत नसली तरीही स्तनातून दूध किंवा पाण्यासारखा स्त्राव होऊ शकतो.
-स्तनाच्या आकारात बदल.
-स्तनाग्र आतल्या बाजूने वळू लागले.


 


स्तनाच्या कर्करोगाची कारणे


सामान्यत: असा समज आहे की, स्तनाचा कर्करोग हा अनुवांशिक आहे, याचा अर्थ जर त्याचा कौटुंबिक इतिहास असेल तर तुम्हालाही तो होणे बंधनकारक असेलच असे नाही. स्तनाच्या कर्करोगाच्या केवळ 10-15 टक्के प्रकरणं ही अनुवांशिक असतात. त्याची नेमकी कारणं अद्याप कळू शकलेली नाहीत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा कॅन्सर केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही प्रभावित करू शकतो.


 


अनुवांशिक संबंध असल्यास अधिक सतर्क रहा


तुमच्या कुटुंबात तुमच्या आईला, वडिलांच्या बहिणींना किंवा त्यांच्या आईला स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर तुम्ही स्वत:चीही स्तनाचा कर्करोग चाचणी (BRCA1 आणि BRCA2) करून घ्या. ही फक्त रक्त तपासणी आहे. जेव्हा त्याचा परिणाम सकारात्मक असतो, तेव्हा स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका 40 टक्क्यांनी वाढतो, यामुळे केवळ स्तनाचा कर्करोगच नाही तर गर्भाशयाच्या कर्करोगाचीही शक्यता वाढते. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा, ज्यांच्या योग्य सल्ल्याने कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.


 


हेही वाचा>>>


Women Health : महिलांनो स्वत:लाही जपा, 'या' कारणांमुळे चाळीशीतच जातेय मासिक पाळी, तोटे जाणून घ्या..


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )