Wan for sankranti 2022: मकर संक्रांत हा भारतात साजरा केलेला लोकप्रिय सण आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असला तरी या सणाचा उत्साह सगळीकडे सारखाच असतो. महिलांच्या दृष्टीने संक्रांतीचे मुख्य आकर्षण म्हणजे हळदी- कुंकू कार्यक्रम. हळदी- कुंकू करायचं म्हटलं की सगळ्यात आधी विचार होतो ते, यंदा संक्रांतीमध्ये काय वाण लुटायचं याचा.. वाणाची वस्तू कशी युनिक आणि हटके असावी शिवाय सगळ्यांना तिचा फायदा व्हावा, अशी प्रत्येकीची अपेक्षा असते. जाणून घ्या सगळ्यांच्या उपयोगी पडेल असं वाण.
मास्क : कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या झपाट्याने वाढतो आहे. कोरोना काळात प्रत्येकाला लागणारी गोष्ट म्हणजे मास्क. त्यामुळे वाण म्हणून मास्कचा विचार करायला काही हरकत नाही. सर्जिकल मास्कचं एक मोठं पाकिट विकत घेऊन त्यातचे 3-4 मास्कदेखील तुम्ही एकेकीला देऊ शकता.
नोटपॅड - महिलांना प्रत्येक गोष्टीची नोंद करण्याची सवय असते. गृहिनींना सामानाची यादी करण्याचीदेखील सवय असते. त्यामुळे वाण म्हणून तुम्हाला लहानसे एखादे नोटपॅड आणि पेन देता येऊ शकते.
कॅलेंडर - नवीन वर्ष सुरू झाल्याने संक्रांतीचे वाण म्हणून कॅलेंडर देणे हा उत्तम उपाय आहे. यात पॉकेट कॅलेंडर किंवा टेबल कॅलेंडरदेखील देता येऊ शकते.
आरसा - महिलांना आरसा हा कायम लागणारी गोष्ट असते. पर्समध्ये किंवा घरातही एखादा जास्तीचा आरसा लागतो. बाजारात सध्या बरेच वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर आरसे मिळतात. असाच एखादा आरसा दिल्यास हळदी-कुंकवाला आलेल्या महिला नक्कीच खूश होतील.
'या' पर्यायांचादेखील करू शकता अवलंब
आपल्याकडे बऱ्याच नवीन वस्तू आलेल्या असतात. त्या सगळ्या आपण वापरत नाही. किंवा वेगवेगळ्या निमित्ताने आपण काही घेतलेले असते. यामध्ये आपण नव्यानेही काही वस्तूंची भर घालू शकतो. या वस्तूंची नावे सगळ्या चिठ्ठ्यांवर लिहून त्या महिलांना निवडायला लावाव्यात आणि जी चिठ्ठी त्या निवडतील ती वस्तू त्यांना वाण म्हणून द्यावी.
हळदी कुंकवाचा कार्यक्रम 14 जानेवारी मकर संक्रांती या दिवसापासून रथसप्तमी पर्यंत आयोजित केला जातो. यंदा रथसप्तमी 7 फेब्रुवारी दिवशी आहे. त्यामुळे तुम्ही यंदा 14 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करू शकता.
संबंधित बातम्या
Makar Sankranti Til Laddu Recipe : मकरसंक्रांतीला घरीच तयार करा तिळाचे लाडू; काय आहे पद्धत?
Makar Sankranti 2022 : हिवाळ्यात तीळ खाल्याने 'हा' होईल लाभ
Makar Sankranti 2022: तीळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या तिळाचे आश्चर्यकारक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha