Makar Sankranti 2022 : 'तीळ गूळ घ्या गोड  बोला' असं म्हणतं आपण संक्रांतीच्या दिवशी (Makar Sankranti 2022) तिळाच्या वड्या वाटतो. तीळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात तीळ खाल्ल्याने काय फायदे होतात.  


तिळाचे आरोग्य फायदे-
तिळामध्ये तांबे आणि मॅंगनीज असते. तसेच  कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी 1, बी 6 थायामिन फोलेट, नियासिन, मॉलिब्डेनम, सेलेनियम आणि झिंक या सर्व गोष्टी देखील तिळामध्ये असतात.  


तिळाच्या बियांमध्ये  सेसमिन आणि सेसमोलिन या दोन गोष्टी असतात. तिळ खाल्ल्याने तुम्हाल मधुमेह होणार नाही. तसेच तिळामुळे हाडे देखील मजबूत होतात तसेच कर्करोगाचा धोका देखील तीळ खाल्ल्याने कमी होतो. तीळ खाल्ल्याने पचन क्रिया देखील चांगली होती. 


केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी करताना अनेकांना रेडिएशनचा त्रास होते. या रेडिएशनमुळे शरीरावर होणाऱ्य हानीपासून देखील तीळ बचाव करते. तुम्हाला जर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आज असतील तर तुम्ही रोज तिळ खाल्ले पाहिजे. उच्च रक्तदाब कमी करण्याचे काम देखील तीळ करते. जुलाबाचा त्रास होत असेल तर एक चमचा भिजलेल्या तिळाची पूड, एक चमचा गायीचं तूप आणि सहा चमचे शेळीचं दूध एकत्र करून दिवसातून तीन वेळा घ्यावे. पोट दुखत असेल किंला फुगलं असेल तर तिळाच्या तेलात हिंग घालून मालिश केल्याने आराम मिळतो. मूळव्याधाचा त्रास असेल तर हिंग वाटून लोण्यासोबत खाल्ल्याने आराम मिळतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


संबंधित बातम्या


Weight Gain : जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये


Winter Skin Care Tips : टोमॅटोचा असा करा वापर, हिवाळ्यातही त्वचा होईल तजेलदार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha