Til Laddu Recipe : तिळाचे लाडू कृती (Til Laddu Recipe): नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे. या दिवशी तिळाचे लाडू (Til Ke Laddu) तयार करण्याची परंपरा आहे. यासोबतच तीळ आणि गुळाशी संबंधित खाद्यपदार्थही या दिवशी बनवले जातात. तिळाचे लाडू लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडतात. हिवाळ्यात तिळाचे लाडू खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं, त्यामुळेच मकर संक्रांतीच्या आधीच बाजारात तिळाचे लाडू सहज उपलब्ध होतात. जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू घरी बनवत आहात आणि तुमची पहिलीच वेळ असेल तर आम्ही तुम्हाला ते बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.


तिळाचे लाडू (Tilache Laddu) बनवण्यासाठी ही सोपी रेसिपी फॉलो करून तुम्ही तिळाचे लाडू घरीच बनवू शकता. ते बनवणं खूप सोपं आहे आणि एकदा बनवलं की, ते बरेच दिवस टिकतात. ते लवकर खराब होत नाहीत.


तिळाचे लाडू (Tilache Laddu) बनवण्याचं साहित्य :


तीळ : 2 कप
गूळ : 1 कप
काजू : 2 टेस्पून
बदाम : 2 टेस्पून
वेलची : 7 ते 8 (ठेचून)
तूप : 2 टीस्पून


तिळाचे लाडू (Tilache Laddu) कसे बनवायचे?


तिळाचे लाडू (Tilache Laddu) बनवण्यासाठी प्रथम तीळ नीट स्वच्छ करून घ्या. यानंतर एक कढई घेऊन गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तीळ टाका आणि तीळ मध्यम आचेवर भाजून घ्या आणि हलकं तपकिरी होईपर्यंत चमच्याच्या साहाय्यानं सतत ढवळत रहा. आता हे भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून थोडे थंड होऊ द्या. भाजलेल्या तिळातून अर्धे तीळ काढून हलके बारीक करून घ्या किंवा मिक्सरने हलके वाटून घ्या.


आता एका पातेल्यात एक चमचा तूप टाकून गरम करा. तूप पूर्णपणे वितळल्यावर त्यात गुळाचे तुकडे टाका आणि मंद आचेवर गूळ वितळू द्या. गूळ वितळल्यावर गॅस बंद करा आणि थंड होण्यासाठी ठेवा. गूळ थंड झाल्यावर त्यात भाजलेले ठेचलेले तीळ घालून चांगले मिक्स करा. यानंतर त्यात काजू, बदाम आणि वेलची पावडर मिसळा. आता गुळ तिळाचा लाडू बनवण्याचं मिश्रण तयार आहे. एका प्लेटमध्ये काढा आणि थोडं थंड होऊ द्या.


हातांना थोडं तूप लावून तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्या. लाडू वळून झाल्यावर काही वेळ तसेच ठेवा. चविष्ठ लाडू तयार आहेत.