मुंबई : शनया काळे या मुंबई-गोरेगाव येथे राहणारी पाच वर्षाच्या मुलीने 14 नोव्हेंबरला नाशिकमधील हरिहर किल्ला सर केला. शनयाला आतापासूनच गडकिल्ले याबद्दल उत्सुकता आहे. मुळात तिचे गाव रायगड येथील जिते-कुंबळमाच सह्याद्रीच्या कुशीत आहे. तिने आतापर्यंत दोन वेळा रायगड किल्ला पायी सर केला आहे. यासोबतच अनेक लहान मोठे ट्रेक केले आहेत.
 
बालदिनाबद्दल शनया काळेने हरिहर किल्ला सर करायचं ठरवलं आणि त्याची तयारी आधीपासूनच सुरु केली होती. नाशिक जिल्ह्यामध्ये हरिहर हा किल्ला भारतातील सर्वात लोकप्रिय आणि थरारक ट्रेक किल्ला आहे. या किल्ल्याला 200 फुट उंचीवर तीव्र आणि सरळ जवळपास 117 कतळात कोरलेल्या पायरी आहेत.


नाशिकमधील हरिहर गड म्हणजे ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी एक आव्हान असतं. त्यामुळे या गडावर ट्रेक करायला ट्रेकर्सची मोठी गर्दी असते.


सुरक्षेच्या दृष्टीने जे काही उपायोजना तसेच हेल्मेट, ऐल्बो आणि लेग गार्ड, रोप, मेडिसिन,  या सगळ्यांची आधीपासूनच तयारी तिच्या मामाने, सुरेश पोळेकर यांनी केली होती. मामा हा जवळचा मित्र असतो असं म्हणतात. शनयाच्या बाबतीत हे चपखलपणे लागत सुध्दा असंच चालू आहे. तिलासुध्दा तिच्या  मामासोबत प्रत्येक ट्रेकिंगला जायला आवडतं. सुरेश पोळेकर यांचा स्वतःच  SAAU SAFAR TREKKERS नावाचा ट्रेकिंग ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यामातून ट्रेकिंग तर केलं जातंच पण सोबत लोकांना मदतीचा हातभार सुध्दा लावला जातो. बालदिनाला या ट्रेकिंग ग्रुपकडून हरिहर किल्ला येथ निरगुडपाडा या गावात जाऊन तेथील मुलांना शैक्षणिक साहित्य, कपडे, खाऊ आणिव अन्य काही आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.


लहान मुलांना ट्रेकला पाठवताना त्यांचा कल लक्षात घेऊन पाठवावे, उगाच जबरदस्तीने पाठवू नये.


संबंधित बातम्या :