नाशिक : मुलींच्या अपहरणाच्या घटना भारतातील प्रत्येक राज्यात घडत असता. पोलीस प्रशासन आणि यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत असून आधुनिक तंत्रज्ञानानंतरही अशाप्रकारचे गुन्हे सर्रास घडत आहेत. दरम्यान नाशिकमध्ये(Nashik) मात्र एका 21 वर्षीय तरुणीचे अपहरण होण्यापासून नाशिक पोलिसांनी (Nashik Police) तिचं संरक्षण केलं आहे. याप्रकरणी आरोपींना अटकही करण्यात आळी आहे.


संबधित घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली. रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या 21 वर्षीय तरुणीची दोन गुंडांनी छेड काढत तिचे अपहरण करत असतांनाच पोलिसांनी या गुंडांच्या (Police Arrested) मुसक्या आवळल्या आहेत. पंचवटी परिसरातील पेठफाटा परिसरात रविवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एक तरुणी रस्त्याने पायी जात होती याचवेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या राम सांगळे आणि रोहित मल्ले या दोन गुंडांनी मुलीसमोर दुचाकी आडवी आधी तिची छेड काढली. त्यानंतर तिला दुचाकीवर बसवत तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.


यावेळी जवळच असलेल्या मुलीच्या काकांनी हा प्रकार पाहताच तात्काळ पोलिसांना फोन केला. ज्यानंतर पंचवटी पोलिसांचे पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या दोघांना ताब्यात घेत मुलीची सुखरूपपणे सुटका केली. या प्रसंगामुळे तरुणी घाबरली असून दोन्ही आरोपींना गुन्हेगारी पार्श्वभूमी असून या प्रकरणाचा पोलिस सध्या तपास करत आहेत. त्यांच्यावर अपहरणासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha