Corona Omicron Variant : पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona Virus) रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्याच वेळी, कोरोनाचा एक नवीन व्हेरियंट समोर आला आहे. या व्हेरियंटचं नाव ओमायक्रॉन (Omicron) असून, तो डेल्टा प्रकारापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. यादरम्यान गर्भवती (Pregnancy) राहिलेल्या महिलांना आणि बाळांना देखील जास्त धोका असतो.


यासोबतच, गर्भधारणेदरम्यान कोरोनाचा संसर्ग केवळ आईसाठीच नाही, तर जन्मलेल्या बाळासाठीही धोका ठरू शकतो. अशा, परिस्थितीत जर तुम्ही गर्भवती असाल, तर तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही कोरोना संसर्गापासून दूर राहू शकता. चला तर, जाणून घेऊया...


चांगले अन्न खा आणि पुरेशी झोप घ्या


गरोदरपणात चांगले अन्न आणि पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अधिक पोषक आहार घ्या. बाहेरचे जंक फूड, जास्त तेलकट-मसालायुक्त पदार्थ, तेलकट अन्न, पॅकबंद अन्न आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाऊ नका. त्याच वेळी, लक्षात ठेवा की, या काळात तुम्हाला पुरेशी विश्रांती देखील घ्यावी लागेल. याचा तुमच्यावर आणि बाळावर देखील परिणाम होतो.


सक्रिय रहा आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करा  


कोरोनाचा धोका टाळण्यासाठी घरच्या घरी व्यायाम करणे देखील महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही योग आणि ध्यानाची मदत घेऊ शकता. यामुळे तणाव आणि चिंता देखील दूर होईल. घरीच श्वासोच्छवासाचे व्यायाम करा. श्वासोच्छवासाच्या व्यायामाने फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.


आजारी लोकांपासून दूर राहा


आधीच आजारी असणाऱ्या बाहेरच्या लोकांना घरात येण्यापासून रोखा. जे लोक आजारी आहेत, त्यांना भेटणे टाळा. तसेच, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.


मास्क घाला आणि अंतर ठेवा


घराबाहेर पडताना नेहमी मास्क घाला आणि लोकांपासून अंतर ठेवा. आपले हात धुत रहा किंवा ते सतत स्वच्छ करत रहा.


डॉक्टरांशी ऑनलाईन सल्लामसलत करा 


अशा परिस्थितीत तुम्ही घराबाहेर पडणे कटाक्षाने टाळा. तसेच, डॉक्टरांशी ऑनलाईन सल्लामसलत करण्याचा प्रयत्न करा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha