Omicron Variant Alert : कोरोनाकाळात रोगप्रतिकार शक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोक विविध उपाय करत आहेत. भाज्या खाल्ल्यानेदेखील रोगप्रतिकार शक्ती वाढवता येते. कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतरही रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास आजाराची तीव्रता कमी प्रमाणात जाणवू शकते.


हिरव्या पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्या रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. हिरव्या पालेभाज्यांचे हिरवे हंग क्लोरोफिल हिमोग्लोबिनसारखे असते. पालेभाज्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. 


ब्रोकोली - ब्रोकोली दिसायला फुलकोबीसारखी दिसते. ब्रोकोलीमध्ये जीवनसत्त्व,फायबर असतात.त्यामुळे ब्रोकोली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. ब्रोकोली भाजी, , सूप, कोशिंबीर इत्यादी म्हणून खाऊ शकतो.


पालक - पालकमध्ये व्हिटॅमिन, आर्यन असते. परंतु याशिवाय अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आणि बीटा-कॅरोटीन देखील भरपूर असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पालकाचे सेवन केलेच पाहिजे.यासाठी तुम्ही पालक उकळून, भाजी म्हणून शिजवून किंवा कच्ची कोशिंबीर बनवून खाऊ शकता.


शिमला मिरची - शिमला मिरची हे फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. दररोज शिमला मिरचीचे सेवन केले तर तुमची रोगप्रतिकार वाढेल. 


फ्लॉवर - फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


Zinc For Health : प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी अत्यावश्यक Zinc, 'या' पदार्थांमधून मिळतात सर्वाधिक पोषक तत्व


COVID 19 Omicron : एकाच व्यक्तीला दोनवेळा संक्रमित करू शकतो ओमायक्रॉन? संसर्ग टाळण्यासाठी काय कराल? जाणून घ्या..


Diabetes Control : मधुमेह नियंत्रणासाठी मेथी, लसूण, दालचिनी लाभदायी! जाणून घ्या याचे फायदे


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha