Omicron Variant : देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये वीकेंड कर्फ्यू आणि नाइट कर्फ्यू सारखे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि घराबाहेर पडायचे असल्यास आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत संपूर्ण खबरदारी घ्यावी. 


मास्क (Mask) : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी स्वच्छ आणि चांगला मास्क वापरावा. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क हे सर्वात मोठे शस्त्र आहे. घराबाहेर पडताना गर्दीच्या ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे गरजेचे आहे.


सामाजिक अंतर (Social Distance) : सामाजिक अंतर - जर तुम्ही सामाजिक अंतराची काळजी घेतली नाही तर तुम्हालाही कोरोनाची लागण होऊ शकते. बस, मेट्रो, ऑफिस, मॉल, दुकाने इत्यादी ठिकाणी एकमेकांपासून योग्य अंतर ठेवावे. तुमची ही चांगली सवय तुमचा कोरोनापासून बचाव करू शकते. 


स्वच्छता (Hygiene) : कोरोनापासून बचाव करण्यासाठी 20 सेकंद हात चांगले स्वच्छ धुवावेत. यासाठी तुम्ही साबणाचा वापर करू शकता. तसेच घराबाहेर असल्यास सॅनिटायझरचा वापर करावा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


Health Tips : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' भाज्या खा, रोग प्रतिकारशक्ती देखील वाढेल


Zinc For Health : प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी अत्यावश्यक Zinc, 'या' पदार्थांमधून मिळतात सर्वाधिक पोषक तत्व


COVID 19 Omicron : एकाच व्यक्तीला दोनवेळा संक्रमित करू शकतो ओमायक्रॉन? संसर्ग टाळण्यासाठी काय कराल? जाणून घ्या..


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha