Company Offers Staff Over 62 Lakh Rupee: सध्या जग मंदीच्या सावटात पुढे जात आहे. अनेक कपन्यांनी टाळेबंदी करायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम अनेकांच्या रोजगारांवर (Employment) झाला आहे. जगभरातील देशांना वेगवेगळ्या समस्या आहेत. काही देश आर्थिक आव्हानांशी झुंज देतायत, तर काही देशांची समस्या ही आहे की, संसाधनांच्या तुलनेत लोकसंख्या वाढत आहे. आजही जगात असे अनेक देश आहेत, जिथे जन्मदर ही एक समस्या कायम आहे. अशा देशांमध्ये दक्षिण कोरियाचाही (South Korea) समावेश आहे. येथील परिस्थिती बिकट असून जन्मदर (Birth Rate) वाढवण्यासाठी नवनवीन योजना आखल्या जातात.


2021 नंतर जन्मासाठी 62.12 लाख रुपये 


दक्षिण कोरिया नावाची एक बांधकाम कंपनी लोकांना मोठ्या ऑफर्स देत आहेत. Booyoung Group आपल्या कर्मचाऱ्यांना 2021 नंतर जन्मलेल्या प्रत्येक मुलांसाठी थोडे थोडके नाही तब्बल 100 मिलियन वॉन (S$101,000) म्हणजेच, 62.12 लाख रुपये देणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना कंपनीचे सीईओ म्हणाले की, देशाचा जन्मदर फारच कमी आहे. जन्मदर वाढवण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 


यामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांचा वैद्यकीय खर्च आणि त्यांच्या मुलांसाठी महाविद्यालयीन शिकवणीचा खर्च समाविष्ट आहे. बूयोंग ग्रुपचे अध्यक्ष ली जोंग-क्युन यांनी सोमवारी (5 फेब्रुवारी) एका बैठकीत सांगितलं की, कंपनी 2021 नंतर जन्मलेल्या प्रत्येक मुलासाठी कर्मचाऱ्यांना 100 दशलक्ष वॉन (S$101,000) देईल.  


फक्त 70 कर्मचारी पात्र 


'द कोरिया टाईम्स'च्या मते, यावर्षी केवळ 70 कर्मचारी कंपनीनं जारी केलेल्या ऑफरसाठी पात्र आहेत, ज्यामुळे कंपनीला एकूण 7 अब्ज वॉन (S$7.08 दशलक्ष) खर्च आला आहे. 84 वर्षांच्या ली यांनी पुष्टी केली की, कंपनी भविष्यात हे धोरण सुरू ठेवेल. द क्यूंग्यांग शिनमुनच्या अहवालानुसार, "जर सरकारनं जमीन उपलब्ध करून दिली, तर आम्ही तीन मुलांना जन्म देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना तीन मुलांसाठी बाळंतपणाचा खर्च किंवा कायमस्वरूपी भाड्याचं घर यापैकी पर्याय देऊ. या दौन पर्यायांपैकी एक पर्याय  तुम्हाला निवडण्याची परवानगी कंपनीकडून दिली जाईल. 


ली यांनी दक्षिण कोरियाच्या जन्मदराबाबत बोलताना एक 


ली यांनी  दिली की जर जन्मदर सध्याच्या दरानं घसरत राहिला तर देशाला 20 वर्षांत राष्ट्रीय अस्तित्वाच्या संकटाचा सामना करावा लागेल. मुलांच्या संगोपनाचा आर्थिक भार, काम आणि कौटुंबिक जीवन संतुलित करण्यात अडचण हे प्रमुख घटक होते. कारणं अशी की, जन्मदर कमी आहे, म्हणून आम्ही एक अपारंपरिक प्रोत्साहन कार्यक्रम सुरू केला आहे.