Winter Skin Care Tips : प्रत्येक महिलेला (Women) सुंदर दिसायला आवडतं. यासाठी त्या अनेक प्रकारे प्रयत्न करून सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करत असतात. हात सुंदर दिसण्यासाठी बहुतेक महिला वॉक्सिंग करतात, मेडिक्युअर करतात. तसेच, हात सुंदर दिसण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे नेलपॉलिश (Nailpolish). मुली अनेकदा नखांवर नवीन रंगीत नेल पॉलिश लावतात. नेल आर्ट डिझाईन्स बनवून आपल्या हातांचं सौंदर्य आणखी वाढवतात. पण तुम्हाला माहित आहे का, या सुंदर नेलपॉलिशमध्ये कधीकधी हानिकारक केमिकल्स असतात जी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
नेलपॉलिश लावणं आरोग्यासाठी घातक
नेल पॉलिश वापरणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. अनेक केमिकल नेलपॉलिशमध्ये आढळतात. जसे की, फॉर्मल्डिहाईड, टोल्युईन आणि डिप्रोपाईल फॅथलेट. ही सर्व केमिकल्स अत्यंत हानिकारक आहेत. त्यांचा सतत आणि दीर्घकाळ वापर केल्याने त्वचेची ऍलर्जी, सूज आणि लालसरपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. नेलपॉलिश रिमूव्हर्स देखील हानिकारक रसायनांनी भरलेले असतात. त्यांच्या वापरामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. त्वचेचा नैसर्गिक तेलकटपणा कमी झाल्याने संसर्ग आणि बॅक्टेरियाचा धोका वाढतो.
श्वसनाच्या समस्या
याशिवाय, नेलपॉलिशमध्ये असलेली केमिकल्स श्वसन प्रणालीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे नेलपॉलिश लावताना किंवा काढताना मास्क घालणे महत्त्वाचे आहे. ट्रायफिनाईल फॉस्फेट फुफ्फुसासाठीही हानिकारक आहे. त्यामुळे फुफ्फुसात सूज येते ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. दम्यासारखे आजारही होऊ शकतात.
गर्भवती महिलांसाठी हानिकारक
हे नेलपॉलिश केमिकल गर्भवती महिलांसाठी आणखी धोकादायक असू शकतात, कारण ते गर्भापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे नेलपॉलिशचा वापर करणे आवश्यक आहे. यासाठी नैसर्गिक घटकांचा समावेश असलेले नेलपॉलिश वापरावे.
मेंदूला नुकसान पोहोचते
टोल्युईन, फॉर्मल्डिहाईड आणि डायथिल फॅथलेट सारखे केमिकल्स नेलपॉलिशमध्ये असतात. हे केमिकल्स शरीराच्या इतर भागांप्रमाणेच मेंदूमध्ये जातात. ही रसायने मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचवू शकतात. या केमिकलमुळे मेंदूतील रक्त परिसंचरण विस्कळीत होते. त्यामुळे तीव्र डोकेदुखी होऊ शकते. नेलपॉलिशमुळे अनेकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रासही होऊ लागतो. त्यामुळे जर तुम्हीसुद्धा वारंवार नेलपॉलिश वापरत असाल तर वेळीच ही सवय बदला.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा काळवंडतेय? 'हा' सोपा घरगुती उपाय करुन पाहा; त्वचा होईल सुंदर