Vinod Tawde : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपकडून खास रणनिती तयार करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात इनकमिंग होतं, त्यासाठी केंद्रीय भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचं संयोजकपद महाराष्ट्रातील विनोद तावडे (vinod tawde) यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत ही समिती  निर्णय घेणार आहे. या समितीचे संयोजकपद विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आले आहे. 


विनोद तावडेंकडे मोठी जबाबदारी -


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आली आहे. आयारामांना आळा घालण्यासाठी केंद्रीय भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे. समितीचे संयोजक विनोद तावडेंना केलं आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत समिती  निर्णय घेणार आहे. समितीच्या परवानगी नंतरच बाहेरच्या पक्षाचे नेता भाजप पक्ष जॉईन करणार आहे. 


समितीमध्ये आठ जण कोण कोण ?


इतर पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत ही समितीच पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय घेणार आहे. भाजपकडून आठ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या प्रवेशाबाबत आठ जणांची समिती  अंतिम निर्णय घेणार आहे. याचं संयोजकपद विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. आठ जणांमध्ये चार केंद्रीय मंत्र्यांचा समावेश भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडवीया यांचा समावेश आहे. तीन राष्ट्रीय महासचिव म्हणजेच विनोद तावडे, तरुण चूग आणि सुनील बंसल यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीमध्ये आसामचे मुख्यमंत्री  हिमंता बिस्वा शर्मा यांनाही स्थान देण्यात आले आहे. या समितीच्या अंतर्गत प्रत्येक राज्यात एक समिती बनवली जाणार आहे, जी इतर नेत्यांच्या भाजपा पक्षप्रवेश बाबत निर्णय घेईल. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याची आज घोषणा केली. 






आणखी वाचा :


Shiv Sena : कुणीही अपात्र ठरणार नाही, कुणाच्याच विरोधात निकाल लागणार नाही, पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता; एबीपी माझाला सूत्रांची माहिती