Skin Lightening Home Remedy : टॅनिंग (Tan) आणि पिगमेंटेशन (Skin Pigmentation) या त्वचेच्या सामान्य समस्या (Skin Care Tips) आहे. फक्त उन्हाळ्यातच (Summer) नाही तर हिवाळ्यातही (Winter) टॅनिंगची (Tanning) समस्या असू शकते. प्रत्येक वेळी तुमच्या त्वचेवर टॅनिंग (Skin Tanning) होत असताना ब्युटी पार्लरमध्ये जाण्याऐवजी तुम्ही यावर घरगुती उपाय करुन सूट मिळवू शकता. त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारातले प्रोडक्टस आणि महागड्या ट्रिटमेंट घेण्याऐवजी घरगुती पॅक आणि स्क्रब वापरून पाहा. या नैसर्गिक घटकांमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात, जे टॅनिंग तसेच त्वचेच्या इतर अनेक समस्या दूर करण्यात मदत करू शकतात. हिवाळ्यातील टॅनपासून सुटका मिळवण्यासाठी सोपा घरगुती उपाय जाणून घ्या.


संत्र्याच्या सालीची पावडर


संत्र्याच्या सालीची पावडर त्वचेसाठी फार उपयुक्त आहे. यामुळे मुरुमे कमी करण्यात मदत होते. यामुळे त्वचेवरील पीगमेंटेशन कमी होऊन ग्लो येण्यास मदत होते आणि त्वचेचा पोतही सुधारतो. यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्मही आहेत.


मसूर डाळ


मसूर डाळीमध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात, त्यामुळे तुमची त्वचा टोन्ड होऊन त्वचेचा रंग उजळेल. त्वचा मुलायम आणि तजेलदार होण्यासाठी मसूर डाळ फेस पॅक उपयुक्त ठरेल. यामुळे त्वचेवरील टॅनिंग, डाग दूर होण्यास मदत होईल. अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सपासून खराब झालेल्या पेशी दूर करून आणि त्वचा घट्ट करण्यास मदत होते, यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि अकाली वृद्धत्व कमी करण्यास मदत होते.


बेसन


बेसन त्वचा स्वच्छ करण्याचा सर्वात बेस्ट पर्याय आहे. बेसन त्वचेचा pH लेव्हल सुधारण्यास मदत होते. बेसन त्वचा एक्सफोलिएट्स करून त्वचेवरील डेड स्किन आणि केस हटवण्यातही फायदेशीर आहे. तुम्ही फेस वॉशऐवजी बेसन आणि तांदळाच्या पीठाने तोंड धुतल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. 


चंदन


चंदन आर्युवेदिक असून त्यामध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म आहेत. यामुळे मुरुम आणि पुरळ दूर होण्यास मदत होते. तसेच, यामुळे त्वचेवरील डाग काढून टाकते आणि त्वचा मऊ होते. यामध्ये अँटी टॅनिंग गुणधर्म आहेत. त्वचेच्या विविध आजारांवरही हा उत्तम उपाय आहे.


बनवण्याची पद्धत : 


दोन चमचा मसूर डाळ, दोन चमचे बेसन, एक चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा संत्र्यांच्या सालीची पावडर, दोन चमचा दही किंवा एलोवेरा जेल हे सर्व एकत्र करून याचा पॅक तयार करा. हा पॅक तुमचे चेहरा, हात आणि पायांवर लावा. हा पॅक 15 ते 20 मिनिटे राहू द्या. त्या नंतर कोमट पाणी स्प्रे करून हा पॅक स्क्रब करा. किमान 5 मिनिटे स्क्रब केल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. हा पॅक आठवड्यातून किमान दोन वेळा वापरा. पहिल्या आठवड्यातच तुम्हाला फरक नक्की दिसून येईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Joint Pain : थंडी वाढताच जुनं दुखणं डोकं वर काढतं, यामागचं खरं कारण माहित आहे का?