Health Tips : पूर्वीच्या काळी अनेक लोकांचे केस 40-50 वर्ष ओलांडल्यावर पांढरे व्हायचे. मात्र, आजकाल लहान मुले आणि तरुणांमध्येही ही समस्या अगदी सहज दिसून येते. जर एखाद्याचे केस 20-25 वर्षांच्या वयात पांढरे होऊ लागले तर ही सामान्य गोष्ट नाहीये हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आजकाल बिघडलेली जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेकांना अकाली केस पांढरे होण्याची समस्या जाणवतेय. वयाच्या आतच केस पांढरे का होतात? यामागे नेमकं कारण काय? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


केस वेळेपूर्वी पांढरे का होतात?


टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, केस अकाली पांढरे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये आनुवंशिकता देखील मोठी भूमिका बजावते, म्हणजे जर तुमचे आई-वडील किंवा आजी-आजोबांचे केस लवकर पांढरे झाले असतील, तर तुमचे केसही लवकर पांढरे होण्याची शक्यता जास्त असते. इतकेच नाही तर हार्मोनल असंतुलन हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे केस लवकर पांढरे होऊ शकतात. याशिवाय चिंता किंवा ताणतणाव, शरीरात पोषक आहाराचा अभाव, आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणात दीर्घकाळ राहणे, धूम्रपान, अनहेल्दी खाणं-पिणं इत्यादी कारणांमुळे वेळेपूर्वी केस गळतात तसेच, केस पांढरे होऊ शकतात. 


तुम्हाला आरोग्याच्या समस्या असल्या तरीही केस पांढरे होतात. जसे की, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता, त्वचारोग, थायरॉईड विकार इ. केस पांढरे होऊ नयेत म्हणून पौष्टिक  आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन ई, सेलेनियम आणि कॉपर सारखे घटक केसांना अकाली पांढरे होण्यापासून वाचविण्याचे काम करतात. केस निरोगी ठेवण्यासाठी ताजी फळे, पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स आणि मासे इत्यादींचे सेवन करणं फायदेशीर ठरेल.


पांढऱ्या केसांवर उपाय काय?


केसांना पोषण देण्यासाठी आणि ते पांढरे होण्यापासून वाचविण्यासाठी तुम्ही नारळ, आवळा आणि बदामाचे तेल लावू शकता. मात्र, त्यातून सर्वांना समान फायदा मिळेलच असे नाही. तणाव आणि धुम्रपानामुळेदेखील केस अकाली पांढरे होतात. त्यामुळे या सवयी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत