श्रीहरिकोटा : चंद्रावर (Moon) पोहचण्याच्या शर्यतीत भारताने रशियाला मागे टाकले आहे. रविवार (20 ऑगस्ट) रोजी रशियाचं लुना - 25 (LUNA 25) हे चांद्रयान चंद्रावर कोसळलं आणि रशियाचं चांद्र मोहिम अपयशी ठरली. भारताचं चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार आहे तर त्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी लुना - 25 हे चंद्रावर उतरणार होतं. भारताचं चांद्रयान -3 (Chandrayan - 3) हे चंद्रापासून अवघ्या 25 किमीच्या अंतरावर आहे. तर हे यान तिथेच चंद्राभोवती फिरत असल्याचं इस्रोच्या (ISRO) शास्रज्ञांनी सांगितलं आहे. तसेच आतापर्यंत चांद्रयान - 3 ची परिस्थिती व्यवस्थित असून 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


चांद्रयान हे 17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले. त्यानंतर विक्रम लँडर ने स्वत: चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु केला. त्यानंतर आता विक्रम लँडर आणि चांद्रयान - 3 मध्ये अवघ्या 25 किमीचं अंतर राहिलं आहे. भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच (इस्रो) ने दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्ट लँडिग करण्यापूर्वी विक्रम लँडरची अंतर्गत चाचणी करण्यात येणार आहे. विक्रम लँडरसोबत प्रज्ञान रोवरची देखील अंतर्गत चाचणी करण्यात येणार आहे. प्रज्ञान रोवर हे विक्रम लँडरसोबतच चंद्राभोवती फिरत आहे. 


23 ऑगस्ट रोजी कसं होणार सॉफ्ट लँडिंग ?


विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिगचा प्रयत्न करणार आहे. याआधी विक्रम लँडर हे संध्याकाळी पाच वाजून 47 मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिगचा प्रयत्न करणार असल्याचं इस्रोकडून सांगण्यात आल होतं. रविवार (21 ऑगस्ट) रोजी इस्रोने ट्विट करत चांद्रयानाच्या सद्य स्थितीविषयी माहिती दिली आहे.


इस्रोने ट्विट करत म्हटलं आहे की, दुसरी आणि अंमित डीबुस्टींगची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरची अंतर्गत चाचणी करण्यात येणार आहे. तसेच लँडिगच्या जागेवर हे यान सूर्य उगवण्याची वाट पाहील आणि त्यानंतर सॉफ्ट लँडिगचा प्रयत्न करेल. 






... तर वाट पाहावी लागणार 


इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर लुनार डे सुरु होणार आहे. चंद्रवरील एक लुनार दिवस हा पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. कारण लुनार हे सोलार पॉवरमुळे चालतात. त्यासाठी त्यांना चंद्राच्या प्रकाशाची गरज असते. त्यामुळे जर 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान - 3 ला सॉफ्ट लँडिग करणं शक्य नाही झालं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सॉफ्ट लँडिगचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पण जर त्या दिवशीही चांद्रयानाला चंद्रावर लँडिग करता नाही आलं तर त्याला पुढील 29 दिवस किंवा कदाचित महिनाभर लँडिगसाठी वाट पाहावी लागणार आहे. कारण हा कालावधी एक लुनार दिवसाच्या बरोबरीचा आहे.  


हेही वाचा : 


Chandrayaan 3 : 'चांद्रयान-3' साठी पुढील 24 तास महत्वाचे, चंद्रापासून फक्त 25 किमी अंतर बाकी; 23 ऑगस्टला 'यावेळी' चंद्रावर उतरणार