Health Tips : थायरॉईड हा देखील मधुमेहासारखाच आजार आहे, जो मानवी शरीरात हळूहळू पसरत जातो. या दोन्ही आजारांबद्दल सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की ते एकदा झाले की ते आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात. या आजारांमुळे तुम्हाला जरी त्रास होत नसला तरी मात्र तुम्हाला रोज गोळ्या घ्याव्या लागतात. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या की अॅलोपथीच्या गोळ्या घेण्याऐवजी तुम्ही आयुर्वेदानुसार उपचार करून देखील तुम्ही या आजारांवर नियंत्रण ठेवू शकता.
थायरॉईडशी संबंधित गैरसमज काय आहेत?
- थायरॉईड हा सामान्यतः स्त्रियांचा आजार मानला जातो. - पण असे नाही की, पुरुषांना हा आजार होत नाही, फरक एवढाच आहे की पुरुषांपेक्षा महिलांना हा आजार जास्त होतो.
- ज्यांना थायरॉईड होतो, त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात. -असे अजिबात नाही. योग्य जीवनशैली, योग्य आहार आणि योगासने या गोळ्यांशिवायही तुम्ही फिट राहू शकता.
- थायरॉईडमुळे वजन वाढवणे किंवा कमी करता येत नाही. - हा समज अनेकांचा आहे. कारण काही लोकांचे वजन थायरॉईडमुळे वाढत जाते, तर काहींचे वजन कमी होऊ लागते.
- थायरॉईड झाल्यानंतर गर्भधारणा होत नाही. - मात्र, तसे नाही. योग्य जीवनशैलीसह थायरॉईड संतुलित करून तुम्ही नैसर्गिकरित्या गर्भवती देखील होऊ शकता.
- ज्यांना थायरॉईड होतो, त्यांचे केस आणि त्वचा कधीही निरोगी राहत नाही. - जर तुम्ही हेल्दी डाएट आणि लाइफस्टाइल फॉलो करत असाल तर ही गोष्टही चुकीची ठरू शकते.
थायरॉईड का होतो?
हा रोग सुरू होण्याच्या अनेक कारणांपैकी, सर्वात सामान्य लक्षणं खालीलप्रमाणे आहेत...
- खूप तणावात असणे
- आळशी जीवनशैली
- झोपेचा अभाव
- आनुवंशिकता
- वाढता लठ्ठपणा
- मधुमेहाची समस्या
- उच्च कोलेस्ट्रॉल समस्या
- झोपण्याची, उठण्याची, खाण्याची निश्चित वेळ नाही
- जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न यांचे अतिसेवन.
ही सर्व कारणे अशी आहेत की तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केल्यास ती उद्भवू शकतात. जर तुम्ही निरोगी जीवनशैलीचे पालन केले तर तुम्हीदेखील या आजारापासून दूर राहू शकाल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :