Salaar OTT Release : प्रभासचा सालार (Salaar) आणि शारुखचा (Shah Rukh Khan) डंकी (Dunki) एकाच वेळी प्रदर्शित झाले. मात्र, सालारने डंकीला मागे टाकत मोठी कमाई केली. भारतात सालारने 475.1 कोटी रुपयांची कमाई केली. तर चित्रपटाच्या जगभरातील कमाईचा आकडा 600 कोटींच्या पार गेलाय. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सालार या सिनेमाबाबत प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान, सालार ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होणार? याबाबत उत्सुकता होती. अखेर नेटफ्लिक्सने (NETFLIX) सालारची रिलीज डेट जाहिर केली आहे. नेटफ्लिक्सने (Salaar OTT Release) सालार बाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यातून रिलीज डेट सांगण्यात आली आहे.


20 जानेवारीला नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित (Salaar OTT Release)


प्रभासची मुख्य भूमिका असलेला सालार हा सिनेमा 20 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  नेटफ्लिक्स इंडियाने सालारचे राईट्स 100 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. दरम्यान आता नेटफ्लिक्सनेच रिलीज डेट (Salaar OTT Release) सांगितल्यामुळे सालारचा ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग सोपा झालाय. 


नेटफ्लिक्सने इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट शेअर करत लिहिले की, "सालार 20 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा 4 भाषांमध्ये आपल्याला सालार पाहाता येणार आहे." नेटफ्लिक्सच्या या पोस्टमुळे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. कारण सालार नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असला तरीही तो हिंदी भाषेत नसेल.






सालारची जगभरात एकूण 725 कोटींची कमाई (Salaar OTT Release)


सालारने जगभरातील प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. सालारने जगभरात 725 कोटी रुपयांचे तगडे कलेक्शन केले आहे. शिवाय अजूनही सिनेमागृहात सालारला तुफान प्रतिसाद मिळतोय. त्यामुळेच सालारची टीम बंगळुरुमध्ये दिग्दर्शक, प्रशांत नील आणि टीमने सक्सेस पार्टी सुरु केली. दिग्दशर्कासह सालारच्या संपूर्ण टीम हा आनंद सेलिब्रेट केलाय. यामध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रृती हसन हे देखील सहभागी झाले होते. सालार शिवाय कल्की 2898 एडी बाबतही प्रभास चर्चेत आहे. या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Animal Movie on OTT : ओटीटी प्लॅटफॉर्मवर अॅनिमल पाहाता येणारच नाही? दिल्ली उच्च न्यायालयाने टी सिरीज आणि नेटफ्लिक्सला बजावला समन्स