मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांना हाताशी धरत वेगळी वाट धरल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक विभागाला गेला. काही जणांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची साथ कायम ठेवली तर काही जणांना एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. दीड वर्षात दोन्ही गटातील कार्यकर्ते अनेकदा आमनेसामने आले. शाखेवरुनही वाद झाले पण तोडगा काही निघाला नव्हता. पण चेंबूरमध्ये दोन्ही शिवसेनेत तोडगा निघालाय. शाखेचा वाद संपलाय. आता शिदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेना एकाच ठिकाणी राहणार आहेत. अर्ध्या शाखेत शिंदेच्या शिवसेनेचे कार्यलाय असेल तर अर्ध्या शाखेत ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यलय असेल. या शाखेचा वाद सोडवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात करावा लागला होता. अखेरीस आज या वादावर पडदा पडला आहे. 


अर्धी शाखा ठाकरे, अर्धी शाखा शिंदेंच्या कार्यकर्त्यांना - 


मुंबईत पुन्हा एकदा शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांच्या समोर आले होते. मात्र पहिल्यांदाच या दोन गटाने सामंजस्याची भूमिका घेऊन तोडगा काढला आहे. मुंबईतील चेंबूरच्या पांजरपोळ येथील शिवसेनेची 146 क्रमांकाची शाखा आहे. ही शाखा माजी आमदार तुकाराम काते यांच्या ताब्यात होती. मात्र ते शिंदे गटात गेल्यावर या शाखेला त्यांनी टाळे मारले. त्यावर ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आणि शिवसैनिकांनी टाळे मारले होते. यामुळे अनेक दिवस ही शाखा बंद होती. मात्र शिंदे गटाच्या वतीने ही शाखा दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर प्रमोद शिंदे आणि शिवसैनिक तिथे पोहचले. यामुळे वाद निर्माण झाला होता. या वाद मिटवण्यासाठी मोठा पोलिस फौजफाटा इथे आला. दोन्ही गटाने सामंजस्याची भूमिका घेत तोडगा काढला आहे. 146 क्रमांकाच्या या शाखेचे आता दोन भाग केले जाणार  आहेत. अर्धी शाखा शिंदे तर आर्धी शाखा ठाकरे गट वापरणार आहेत. 


दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना हाताशी धरत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनाच शिवसेना आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगाने दिला. नुकताच विधानसभा अध्यक्षांनीही शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय दिला. त्यांनी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही. आता हे शिंदे गटाकडून हे प्रकरण हायकोर्टात नेण्यात आले तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 



आणखी वाचा : 


आम्ही भाजप सोडून शिवसेनेत येतोय, भाजप, विहिंपचे कार्यकर्ते ठाकरे गटात, उद्धव ठाकरे म्हणाले, काही नालायकांकडून हिंदुत्व-भगव्यात भेद!