Side Effects Of Over Exercise : कोरोना (Covid 19) काळानंतर म्हणा किंवा त्यापूर्वी लोकांमध्ये फिटनेसची क्रेझ अगदी झपाट्याने वाढली. रोगप्रतिकारकशक्ती उत्तम ठेवण्याचा मार्ग म्हणजे फिटनेस हे एक समीकरणच झालं. आणि म्हणून प्रत्येकजण व्यायम करण्याच्या मागे जीमला जाऊ लागला. जिममध्ये गेल्यानंतर सुद्धा काही लोक तासन् तास व्यायाम करतात. निरोगी आणि तंदुरूस्त शरीरासाठी व्यायाम करणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र, एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक ठरतो. तासन् तास व्यायाम केल्याने ब्रेन हॅमरेज आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. किती वेळ व्यायाम करावा हे जाणून घ्या. 


हार्डकोर व्यायाम किती वेळ करावा?


या संदर्भात डॉक्टर असा सल्ला देतात की, सर्वसामान्य लोकांनी हार्डकोर व्यायाम करणे टाळावे. फिट राहण्यासाठी दिवसातून कमीत कमी 20 ते 25 मिनिटं व्यायाम करणे पुरेसे आहे. जितका हलका तुम्ही व्यायाम कराल तितकं तुमचं शरीर निरोगी राहील. हार्डकोर वर्कआऊट खेळाडूंनी करावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.


आठवड्यातून किती दिवस व्यायाम करणे आवश्यक? 


शरीराला तंदुरूस्त ठेवण्यासाठी खरंतर रोजच व्यायाम करणे गरजेचे आहे. मात्र, शरीरावर तेवढाच व्यायाम टाकला पाहिजे जेवढं शरीर सहन करू शकेल. आठवड्यातून फक्त पाच दिवस व्यायाम केल्यास फायदा होऊ शकतो. फिटनेससाठी अर्धा तास व्यायाम करणे पुरेसे आहे. या जीवनशैलीमुळे पॅरालाईझ, मधुमेह, हायपरटेन्शन आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. 


जास्त व्यायाम केल्याने धोका :


अनेक संशोधनांमध्ये असे समोर आले आहे की, हार्डकोर व्यायामामुळे हृदयाचे ठोके अचानक बंद होतात. काही वेळा जास्त व्यायाम केल्याने मेंदूला रक्तस्त्राव होऊ शकतो. काही वेळा खूप जास्त व्यायाम केल्याने कार्डियाक अरेस्ट (SCA) आणि ब्रेन हॅमरेजचा धोका वाढतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढाच व्यायाम करावा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :