Superfood For Brain : कोरोना (Covid19) महामारीनंतर अनेकांना मानसिक आजारांचा सामना करावा लागला. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांवर झालेला आहे. लोक मानसिक तणाव आणि चिंता या आजारांनी त्रस्त आहेत. यामुळे डिप्रेशनचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. अशा वेळी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही 5 सुपरफूड्सची नावे सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा मेंदू सक्रिय होईल. या पदार्थांचा तुम्ही नक्कीच तुमच्या आहारात समावेश करू शकता. हे सुपरफूड्स कोणते ते जाणून घ्या. 


स्मरणशक्ती सक्रिय करणारे सुपरफूड्स : 


1. भोपळ्याच्या बिया : भोपळ्याच्या बियांचा आरोग्यासाठी, मेंदूसाठी खूप चांगला उपयोग होतो. भोपळ्याच्या बिया मनाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. बियांमध्ये भोपळ्याच्या बिया सर्वात फायदेशीर आहेत. यामुळे तुमचे मन निरोगी आणि सक्रिय होते. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, तांबे आणि लोह असते. जे मेंदूला ऊर्जा देतात. 


2. अक्रोड : अक्रोड जरी दिसायला लहान असले तरी त्याचे फायदे मात्र अनेक आहेत. अक्रोड मेंदूला निरोगी आणि तीक्ष्ण बनविण्याचे काम करते. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, कॉपर, मॅंगनीज, ओमेगा-3 आणि अँटीऑक्सिडंट घटक असतात, जे मानसिक विकासास मदत करतात. 


3. डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेट चवीला कडू असल्यामुळे अनेकांना ते खायला आवडत नाहीत. मात्र, डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, जे चिंता आणि तणाव दूर करून मेंदूला निरोगी बनवतात. 


4. अंडी : अंड्याला सुपरफूड म्हटले जाते. निरोगी शरीरासाठी दररोज एक अंड खाणे गरजेचे आहे. यातून शरीराला प्रथिने मिळतात आणि अंडी हे मेंदूसाठीही उत्तम अन्न आहे. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी आणि कोलीनसारखे पोषक घटक असतात, जे मेंदूला निरोगी ठेवतात. 


5. हिरव्या पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर करा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक, ब्रोकोली यांचा अधिक वापर करा. यामध्ये व्हिटॅमिन के, फोलेट, बीटा कॅरोटीन आणि ल्युटीन असते जे स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :