Kidney Health : शरीरातील सगळेच अवयव महत्वाचे असतात. यापैकी किडनी (Kidney) हा शरीराचा सर्वात महत्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. किडनी शरीरातील घाण साफ करण्यास मदत करते. इतकंच नाही तर रक्तातील घाण साफ करण्यातही हे गुणकारी आहे. अशा स्थितीत किडनी नीट काम करत नसेल तर शरीरात अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.. त्यामुळे किडनी स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. किडनी निरोगी ठेवायची असेल तर लिंबाचे सेवन करा. लिंबू सेवन केल्याने मूत्रपिंडातील घाण साफ होते. किडनी निरोगी ठेवण्यासाठी लिंबाचे सेवन कसे करावे? हे जाणून घेऊयात.
मिंटसोबत लिंबू (पुदिन्यासोबत लिंबू) :
किडनी निरोगी ठेवण्यासाठी पुदिना आणि लिंबूपासून तयार केलेले पेय सेवन केले जाऊ शकते. हे पेय तयार करण्यासाठी, एक ग्लास पाणी घ्या. त्यात लिंबाचा रस, काही पुदिन्याची पाने आणि थोडी साखर घालून मिक्स करा. या पेयाच्या सेवनाने तुमची किडनी निरोगी राहते.
मसाला लिंबू सोडा :
जर तुम्हाला थोडे मसालेदार पेय पिण्याची आवड असेल तर तुम्ही मसाला लिंबू सोड्याचे सेवन करू शकता. यामुळे तुमची किडनी निरोगी राहते. हे पेय तयार करण्यासाठी, एक ग्लास घ्या. लिंबाचा रस, जिरे-धणे पूड, चाट मसाला आणि सोडा पाणी घालून चांगले मिक्स करा. आता हे तयार पेय प्या. याच्या मदतीने तुम्ही किडनी निरोगी ठेवू शकता.
नारळाची शिकंजी :
किडनी निरोगी ठेवण्यासाठी नारळाची शिकंजी हे हेल्दी ड्रिंक असू शकते. हे पेय तयार करण्यासाठी एका ग्लासमध्ये नारळ पाणी घ्या. या पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या.
जर तुम्ही लिंबूबरोबर या पेयांचे सेवन केले तर तुमची किडनी निरोगी राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :