Health Tips : अनेक वेळा फोनचा वापर जास्त केल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे लोकांना डोळ्यामधून सतत पाणी येण्याची समस्या जाणवते. तसेच डोळे लाल होणे, डोळे दुखणे इत्यादी समस्या देखील तुम्हाला जाणवू शकतात. सतत डोळ्यामधून पाणी येण्याची काही कारणं असू शकतात. 


डोळ्यांमध्ये कोरडेपणा जणवणे 
डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवल्यानं देखील डोळ्यांमधून पाणी येतं. शरीरामध्ये पाण्याचं आणि तेलाचं प्रमाण कमी झाल्यामुळे डोळे कोरडे पडतात. त्यामुळे डोळे सूजतात आणि डोळ्यांमधून पाणी येतं. 


अॅलर्जी
काही लोकांना धुळीची किंवा इतर काही गोष्टींची एलर्जी असते. अॅलर्जीमुळे डोळ्यांमधून पाणी येऊ शकते. तसेच थंडीमध्ये देखील डोळ्यांना खाज सूटते आणि डोळ्यांमधून पाणी येतं. 


ब्लेफेरायटिस 
डोळ्यांच्या बाहेरील भागास सुज आल्यानं डोळ्यांधून पाणी येतं. यासाच ब्लेफेरायटिस असं देखूल म्हटलं जात.  ब्लेफेरायटिसमुळे डोळ्यांना खाज सुटते आणि डोळ्यांमधून पाणी येतं.  


पापण्यांची समस्या 
काही लोकांच्या पापण्या मोठ्या असतात. त्यामुळे पापण्या डोळ्यांमध्ये गेल्यानं देखील डोळ्यांमधून पाणी येतं. 


अनेक वेळा डोळ्यांमध्ये धुळ, माती गेल्यानंतर लोक डोळ्यांवरून हात फिरवतात. त्यामुळे आयबॉल्सवर ओरखडे पडू शकतात. डोळे चोळल्यामुळे ते लाल होतात आणि त्यामधून पाणी येतं.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha