Belly fat : बदलती जीवनशैली आणि तेलकट अन्न यामुळे वजन वाढणे सामान्य आहे, त्यामुळे पोटाची चरबी देखील खूप वाढते. पोटावरची चरबी वाढल्यामुळे कपडे घट्ट होऊ लागतात आणि तुम्हाला लाजीरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. निरोगी राहण्यासाठी आहारात फळे खाण्याची शिफारस अनेकदा केली जाते. परंतु, अशी काही फळे अशी आहेत, जी वारंवार खाल्ल्यास पोटावरची चरबी वाढू शकते.


बाजारात अशी काही फळे उपलब्ध आहेत, जी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा फळांपासून लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष सतर्क राहावे. ज्यांचे वजन वाढलेले नाही, त्यांनीही जास्त साखर असलेली ही फळे मर्यादित प्रमाणातच खावीत.


पोटाची चरबी कशी कमी करावी?


जर, तुम्हाला पोटाची चरबी आणि शरीरावरील चरबी अर्थात फॅट कमी करायचे असेल, तर आहारातून कार्बोहायड्रेट आणि साखर काढून टाकण्याची गरज आहे. कमी फॅटयुक्त अन्नानेही वाढलेले वजन कमी करता येते. वाढत्या वजनाने मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.


या 2 फळांपासून दूर राहा!


आंबा विशेषतः उन्हाळ्यात खाल्ला जातो, ज्याला फळांचा राजा देखील म्हटले जाते. भारतातील लोक आंबा खूप आवडीने खातात, तसेच मँगो शेक देखील इथे खूप आवडीने प्यायला जातो. पण, आंब्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. वजन वाढवण्यासाठी हे फळ कारणीभूत ठरते. त्याचबरोबर अननस हे फळ देखील खायलाही खूप गोड असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. विशेषत: मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांना आंबा आणि अननस न खाण्याचा सल्ला दिला जातो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha