Coronavirus Cases Today in India: देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत किंचीत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 1 हजार 938 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 67 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, काल देशात 1 हजार 778 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर 62 जणांचा मृत्यू झाला होता. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 14 हजार 687 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 


सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल देशात 2 हजार 531 लोक कोरोनातून बरे झाले होते. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 22 हजार 427 वर आली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत 5 लाख 16 हजार 672 जणांचा मृत्यू झाल आहे. तर आतापर्यंत देशात 4 कोटी 24 लाख 75 हजार 588 लोक कोरोनातून संसर्गमुक्त झाले आहेत.


 





आतापर्यंत 182 कोटींहून अधिक लसींचे डोस 


सध्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसींचे 182 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल देशात 31 लाख 81 हजार 809 लसींचे डोस देण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत 182 कोटी 23 लाख 30 हजार 356 डोस लसींचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 


महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या देखील आटोक्यात येत असल्याचं चित्र दिसत आहे. काल राज्यात 149  रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात  222  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,23, 959  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 90, 68, 319  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. सध्या राज्यात 1084 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत  277  अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 136 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.