एक्स्प्लोर

Health Tips : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची ही आहेत 11 लक्षणं; तुमच्यामध्येही आढळल्यास वेळीच सावध व्हा

Vitamin D Deficiency Symptoms : व्हिटॅमिन डी हाडांच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक मानले जाते. यामुळेच शरीरात त्याचे पुरेसे प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे.

Vitamin D Deficiency Symptoms : जेव्हा शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी (Vitamin D) मिळत नाही, तेव्हा त्याच्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. व्हिटॅमिन डीला सूर्यप्रकाशातील जीवनसत्व असेही म्हणतात. कारण सूर्य हा व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, हाडांची घनता कमी होते आणि हाडे सहजपणे क्रॅक होऊ शकतात. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही निर्माण होऊ शकतो. व्हिटॅमिन डी हाडांच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक मानले जाते. यामुळेच शरीरात त्याचे पुरेसे प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे.

काही खाद्यपदार्थ जसे की फॅटी फिश आणि दुग्धजन्य पदार्थ व्हिटॅमिन डी असतात. व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न खाल्ल्याने त्याची कमतरता बर्‍याच प्रमाणात दूर केली जाऊ शकते. जगभरात मोठ्या संख्येने लोक आहेत ज्यांना व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे आणि स्नायूंच्या समस्या निर्माण होतात. त्याची कमतरता नवजात मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांना जाणवू शकते. चला जाणून घेऊया शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे हे कसे ओळखता येईल.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे

1. स्नायूंमध्ये थकवा जाणवणे

2. हाडे दुखणे

3. मुलांच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा किंवा वेदना जाणवणे. 

4. वारंवार आजारी पडणे किंवा संसर्ग होणे

5. थकवा जाणवणे

6. पाठदुखीचा त्रास 

7. हाडांची झीज

8. केस गळणे

9. स्नायू दुखणे

10. काळजी

11. अशक्तपणा 

व्हिटॅमिन डी आरोग्यासाठी का महत्त्वाचे आहे?

हाडांचे आरोग्य आणि प्रतिकारशक्ती यांसह शरीराच्या अनेक आवश्यक कार्यांमध्ये व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत होते. या व्यतिरिक्त, हाडांचे नुकसान प्रतिबंधित करते. तसेच नैराश्य, हृदयरोग, मधुमेह आणि अनेक दीर्घकालीन आरोग्य समस्यांपासून संरक्षण प्रदान करते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा उपचार सामान्यतः पूरक आहाराने केला जातो. मात्र, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करू शकता. म्हणूनच खाण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवणार नाही. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Workout Tips : चुकीच्या पद्धतीने केलेले 'हे' वर्कआउट केवळ फायदाच नाही तर नुकसानही देतात, जाणून घ्या कसे?

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget