Valmiki Jayanti 2021: हिंदू धर्मात महर्षी वाल्मिकी जयंतीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील पूर्णिमेच्या तिथीला महर्षी वाल्मिकी जयंती साजरी केली जाते. अश्विन पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते. यावर्षी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज (20 ऑक्टोबर) संपूर्ण देशभरात साजरी केली जात आहे. या दिवशी महर्षी वाल्मिकी यांची मंदिरात विशेष प्राथना केली जाते. महर्षी वाल्मिकी यांनी संस्कृत श्लोक रचले आहेत. पौराणिक ग्रंथांनुसार, महर्षि वाल्मिकी यांनीच रामायण रचले आहे. ज्यामुळे त्यांना संस्कृतचे अदिकवी म्हणून संबोधले जाते.


भारताच्या उत्तर भागात विशेषत: हिंदू भक्तांद्वारे मोठ्या उत्साहाने महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी केली जाते. महर्षी वाल्मिकी यांचे मंदिरे फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात येतात. वाल्मिक यांच्या मंदिरात अन्न भंडार करुन जेवण दिले जाते. पूजा आणि अनुष्ठान देखील या दिवशी केले जातात. तसेच या दिवशी लोक शोभायात्रेत भाग घेऊन वाल्मिकी प्रदेशातील रस्त्यांवरून फिरतात. याचे प्रतिनिधित्व पुजारी करतात. हे देखील वाचा- Jashn-e-Riwaaz: 'जश्न-ए-रिवाज'; फॅब इंडियाच्या दिवाळी कॅम्पेनवर भडकले नेटकरी


महर्षी वाल्मिकी जयंतीचे महत्व-


महर्षी वाल्मिकी हे पहिले संस्कृत कवी आहेत. त्याला संस्कृतचे आदिकवी म्हणतात. त्यांनी रामायण महाकाव्य संस्कृतमध्ये रचले. हे रामायण वाल्मिकी रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. रामायणात एकूण 24000 श्लोक आहेत.


महर्षी वाल्मिकी जयंतीचे मुहूर्त- 


हिंदू दिनदर्शिकेनुसार, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:03 पासून सुरू झाली. तर, 20 ऑक्टोबर रोजी 8.26 वाजता संपणार आहे.  वाल्मिकी जयंतीच्या दिवशी म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी राहुकाल दुपारी 12:06 ते 01.31 पर्यंत आहे. राहुकालात पूजा करण्यास मनाई आहे. राहुकाल दुपारी 12:06 ते दुपारी 01.31 पर्यंत आहे. पूजा इत्यादी शुभ कामे राहुकाळाच्या वेळी केली जात नाहीत. या दिवशी अमृत काल रात्री 11.27 ते 01.10 आणि विजय मुहूर्त दुपारी 01:59 ते 02:45 पर्यंत आहे.