Fabindia Jashn-e-Riwaaz: सध्या सोशल मीडियावर बॉयकॉट फॅब इंडिया हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. फॅब इंडिया हा  होम डेकोर आणि  लाईफस्टाईल प्रोडक्ट्सचा ब्रॅंड आहे. त्यांच्या दिवाळी कॅम्पेनच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. फॅब इंडियाने त्यांच्या दिवाळी कॅम्पेनचे नाव 'जश्न-ए-रिवाज' असे ठेवले आहे. त्यामुळे सध्या फॅब इंडिया कंपनी सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. तेजस्वी सूर्या यांनी सांगितले की, दिवाळी सण हा  'जश्न-ए-रिवाज' नाहिये. 


फॅब इंडियाने ट्विट केले होते, 'जसे तुम्ही प्रेमाने कोणत्याही सणाचे स्वागत करता. तसेच फॅब इंडियाचे 'जश्न-ए-रिवाज' हे असे कलेक्शन आहे जे भारतीय संस्कृतीला नमन करते.' सोशल मीडियावर हे ट्विट चर्चेत आल्यानंतर फॅब इंडियाने ते सोशल मीडियावरून डिलीट केले. फॅब इंडियाच्या या कॅम्पेनवर मोहनदास पाई यांनी आणि  तेजस्वी सूर्या यांनी निषेध दर्शवला.


मोहनदास पाई यांनी सोशल मीडियावर ट्विट केले, 'हिंदू सणांसाठी विदेशी भाषा वापरणे आपल्या संस्कृतीला नष्ट करण्यासारखे आहे. दिवाळीनंतर तुम्ही कोणत्याही ब्रॅंडच्या नावाचा उपयोग करू शकता. पण या नावाला दिवाळीसोबत जोडणे विकृत मानसिकता आहे. ' त्यानंतर फॅब इंडियाला सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केले.  या विषयी तेजस्वी सूर्या म्हणाले,'दिवाळी ही 'जश्न-ए-रिवाज' नाहिये. असे नाव ठेवल्याने कंपनीला आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागेल.'  


World Food Day 2021: जागतिक अन्न दिन; जाणून घ्या महत्व, इतिहास आणि या वर्षाची थीम


नेटकऱ्यांनी कमेंट करत केले ट्रोल
फॅब इंडियाच्या 'जश्न-ए-रिवाज' या कॅम्पेनवर अनेक नेटकरी भडकले आहेत. सोशल मीडियावर एका यूझरने पोस्ट लिहीली, 'भाऊबीज आणि दिवाळी हे काय मुस्लिम सण आहेत का? त्याचं नाव जश्न-ए-रिवाज असं का ठेवण्यात आलं आहे? ' तर दुसऱ्याने लिहीले, 'फॅब इंडियाला बायकॉट करा'


Health Care Tips: 'या' लोकांनी चुकूनही करू नये दुधासोबत हळदीचे सेवन; आरोग्यावर होतील वाईट परिणाम