Michael Slater Arrested: ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मायकल स्टेलर यांना घरगुती हिंसाचारप्रकरणी (domestic violence) अटक करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील वर्तमानपत्रांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. मायकल स्टेलर यांची मॅनेजर सीन अँडरसन यांनी याप्रकरणी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी स्टेलर यांच्या अटकेलाच्या वृत्तला दुजोरा दिलाय. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात मंगळवारी मायकल स्टेलर यांच्याविरोधात घरगुती हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरु झाला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर मैनाली येथील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी 51 वर्षीय मायकल स्लेटर यांच्याविरोधात जवळपास एक आठवडाभर तपास केला. त्यानंतर बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आलं. 12 ऑक्टोबर रोजी स्टेलर यांच्याविरोधात ईस्टर्सन सबअर्ब्स पोलीस आधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मिळाले. त्यानंतर त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
1993 ते 2001 यादरम्यान स्टेलरने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यादरम्यान त्यांनी 74 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळले होते. कसोटीमध्ये 5312 आणि एकदिवसीय सामन्यात 987 धावा स्टेलर यांच्या नावावर आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्लेटर १५ वर्षांपासून समालोचकाचं काम करत आहेत. गेल्या महिन्यात 7 नेटवर्कसोबतचा त्यांचा करार संपुष्टात आला होता.
वाद आणि मायकल स्टेलर -
51 वर्षीय मायकल स्टेलर आणि वाद याचं जवळचं नात असल्याचं अनेक प्रकरणातून दिसून आलेय. स्टेलर यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याविरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर मोठा वाद उपस्थित झाला होता. कोरोनामुळे गेल्यावर्षी आयपीएल अर्ध्यात थांबवलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील खेळाडू आणि समालोचकांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून ऑस्ट्रेलियात भारतातून येणाऱ्या विमानप्रवासावर बंदी घालण्यात आली होती. त्यावर मायकल स्टेलर यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. वाद निर्माण झाल्यानंतरही स्टेलर यांनी माफी मागण्यास नकार दिला होता.