Bleeding Gum Problems : आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच दातांच्या समस्या येऊ लागल्या आहेत. नीट ब्रश न करणे, तोंड अस्वच्छ ठेवणे, धुम्रपान यामुळे तोंडात बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. त्यामुळे दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्या निर्माण होतात. कधीकधी या समस्या इतकी गंभीर होते की, लहान मुलांचे दातही काढावे लागतात. काहींच्या तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. हिरड्यांमधून रक्तस्त्राव आणि दातांच्या हालचालीची समस्या देखील उद्भवते. याला ‘पीरियडेन्टल’ समस्या म्हणतात.
अनेक वेळा दात किंवा हिरड्याचे दुखणे तुम्हाला रात्रभर झोपू देत नाही. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय करून तुम्ही दात आणि हिरड्या दुखण्यापासून आराम मिळवू शकता.
निलगिरी तेल : जर तुमच्या हिरड्यांना संसर्ग झाला असेल, तर तुम्ही निलगिरीचे तेल लावू शकता. निलगिरीचे तेल अँटी-इन्फ्लामेट्री डिसइन्फेक्टेंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. याच्या मदतीने, हिरड्यांचे दुखणे कमी होण्यावर उपचार केले जाऊ शकतात.
मीठ : दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्या असल्यास मीठाचा वादेखील पर केला जातो. मीठ बॅक्टेरियल घटक म्हणून काम करतो. यामुळे हिरड्यांची सूज कमी होते. हिरड्या आणि दातांशी संबंधित समस्या असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो.
ग्रीन टी : दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. ग्रीन टीमुळे दात आणि हिरड्यांचे अनेक आजार बरे होतात. आपण दररोज 1-2 कप ग्रीन टी पिणे आवश्यक आहे.
हळद : दात दुखत असल्यास किंवा हिरड्यांशी संबंधित समस्या असल्यास हळदीचा वापर करावा. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असते. हिरड्यांना सूज किंवा रक्तस्त्राव झाल्यास तुम्ही हळद लावू शकता.
कोरफड : कोरफड हे तोंडाच्या आरोग्यासाठी देखील एक औषध आहे. कोरफड जेल हिरड्यांवर लावल्याने अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
- Health Tips : गव्हाची चपाती की मल्टीग्रेन आटा रोटी, वजन कमी करण्यासाठी कोण ठरेल फायदेशीर?
- Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात नक्की सामील करा ‘ही’ फळं आणि भाज्या!
- Health Tips : शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी दररोज 'हे' एनर्जी ड्रिंक्स प्या, मिळतील अनेक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha