Travelling Tips : आठवडाभर तणावातून काम केल्यानंतर एखाद्या लॉंग ड्राईव्हला किंवा प्रवासाला, वीकेंडला जावं असं प्रत्येकाला वाटतं. अनेकजण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवार, रविवारी वीकेंडचा प्लॅनही करतात. मात्र, यंदा दसऱ्याच्या सुट्टीमुळे लोकांना पुन्हा एकदा लाँग वीकेंड मिळणार आहे. अशा वेळी या काळात तुमचाही लॉंग ड्राईव्हला जाण्याचा प्लॅन असेल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.
लाँग ड्राईव्हमुळे मूड फ्रेश होतो. मित्र आणि कुटुंबियांबरोबर लाँग ड्राईव्हवर जाणं आणखी मजेदार आहे. अनेकांना एकट्याने लाँग ड्राईव्हचा आनंद घ्यायला आवडतो. तसेच, लाँग ड्राईव्हवर जाण्यापूर्वी आपण काही चुका करतो. जर तुम्हीही या वीकेंडला लाँग ड्राईव्हवर जाण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या काही खास गोष्टींबद्दल ज्या तुम्ही लाँग ड्राईव्हवर जाण्यापूर्वी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
तुमच्या कारची सर्व्हिस करून घ्यायला विसरू नका
लाँग ड्राईव्हचे प्लॅनिंग करण्यापूर्वी तुमच्या कारच्या सर्व्हिसिंगला सर्वात आधी महत्त्व द्या. हायवेवर असताना तुमचे वाहन योगायोगाने अडचणीत आले तर गॅरेज किंवा वर्कशॉप शोधणे कठीण होऊ शकते. अशा वेळी तुमच्या वाहनाची सर्व कार्ये पेट्रोल बरोबरच सर्व्हिसिंग करणे अत्यंत आवश्यक आहे.
तुमच्याबरोबर टूल किट ठेवा
सर्व्हिसिंग असूनही, कार पंक्चरसारख्या समस्या अचानक उद्भवू शकतात. यासाठी तुम्हाला अगोदरच तयारी करावी लागेल. अशा परिस्थितीत, घर सोडण्यापूर्वी, कारमध्ये टूल किट आणि टायर सोबत ठेवण्यास विसरू नका. यासह, तुम्हाला गॅरेज आणि मेकॅनिक शोधण्यात वेळ वाया घालवावा लागणार नाही.
तुमची सर्व कागदपत्रे तुमच्याकडे ठेवा
कोणताही प्रवास करण्यापूर्वी तुमची महत्त्वाची कागदपत्रे तुमच्या बरोबर असली पाहिजेत. तुमच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या मूळ आणि झेरॉक्स नेहमी तुमच्याबरोबर ठेवा. तुमच्या वाहनाच्या कागदपत्रांव्यतिरिक्त, तुमची वैयक्तिक कागदपत्रे जसे की, आधार कार्ड, पासपोर्ट बरोबर ठेवण्यास विसरू नका.
फर्स्ट एड किट
संकट कधीच सांगून येत नाही. लाँग ड्राईव्हला निघण्यापूर्वी कारमध्ये एक लहान फर्स्ट एड किट ठेवा. तसेच काही औषधे बरोबर ठेवा. जसे की, गॅस, ऍसिडिटी, पोटदुखी, जुलाब यासाठी काही औषधे तुमच्याबरोबर ठेवा. अशा परिस्थितीत, कोणत्याही किरकोळ समस्येच्या बाबतीत, हे कामात येतील आणि तुमचा प्रवास चांगला होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :