Health Tips : भारतात सध्या सगळीकडे नवरात्रौत्सवाचं (Navratri 2023) वातावरण आहे. हिंदू धर्मात 9 दिवसांना खूप महत्त्व आहे. या दरम्यान भक्त नऊ देवीचे उपवास करतायत. मात्र, मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी उपवास थोडा त्रासदायक ठरू शकतो. कारण फळांच्या आहारातील बहुतेक गोष्टी गोड असतात, ज्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकतात अशी काही फळे आहेत जी रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. अशा स्थितीत मधुमेहाच्या रूग्णांनी आहारात काय खावे? हा सर्वात मोठा प्रश्न असतो. चला तर मग जाणून घेऊयात नवरात्रीच्या उपवासात मधुमेही रुग्ण काय खाऊ शकतात.
 
सफरचंद खा, केळी नाही


केळी हे आरोग्यदायी फळ आहे पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते चांगले मानले जात नाही. कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी उपवासात केळ्याऐवजी सफरचंदाचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
 
पेरू खा, चिकू नाही


चिकू हे जास्त साखर असलेले फळ आहे. त्यामुळे नवरात्रीच्या उपवासात मधुमेहाच्या रुग्णांनी फळांच्या आहारात याचा समावेश करू नये. या फळाच्या अतिसेवनाने रक्तातील साखर वाढू शकते. त्याऐवजी पेरू फायदेशीर ठरू शकतो. पेरू भूक कमी करण्यास मदत करू शकते.
 
लिची ऐवजी पपईचे सेवन करा


नवरात्रीच्या उपवासात मधुमेहाच्या रुग्णांनी लिची खाऊ नये. कारण लिचीमध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते. हे फळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्याऐवजी पपईचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पपईमुळे मधुमेहाशी संबंधित अनेक समस्यांचा धोका कमी होतो.
 
अननस नव्हे तर नाशपाती खाणे फायदेशीर 


मधुमेहाच्या रुग्णांनी उपवासात अननस खाणे टाळावे. त्यात असलेली साखर तुमच्यासाठी घातक ठरू शकते. त्याऐवजी नाशपाती खाणे फायदेशीर ठरेल. त्यात अननसापेक्षा कमी साखर असते. नाशपाती फायदेशीर मानली जाते कारण त्यात भरपूर पोषक असतात.
 
चेरी ऐवजी संत्री खा


चेरी हे उच्च साखरेचे फळ आहे, ज्याचे सेवन रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. त्याऐवजी संत्र्याचे सेवन अधिक फायदेशीर मानले जाते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यात इतरही अनेक पोषक घटक आढळतात. संत्र्यामध्येही पाण्याचे प्रमाण जास्त असते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Navratri 2023 : ऑफिसला जायचं असेल आणि उपवासही करायचा असेल तर रात्रीच 'ही' कामे करा; सकाळ उत्साही राहील