मुंबई : राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीवरुन (Contract recruitment Maharashtra) तोफ डागली.  यावेळी फडणवीसांनी कंत्राटी भरतीचं (Contract Bharti) पाप हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress NCP) काळातील सरकारचं आहे. हे पाप आम्ही वाहणार नाही. कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती महाराष्ट्रात कधीपासून सुरु झाली याची कुंडलीच मांडली. यावेळी फडणवीसांनी चार माजी मुख्यमंत्र्यांवर तोफा डागल्या. 


1) सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde)


देवेंद्र फडणवीस यांनी 2003 पासूनच्या तारखांसह कंत्राटी भरतीची मांडणी केली. महाराष्ट्रमध्ये कंत्राटी भरतीसंदर्भात मुद्दाम गदारोळ उठवला जात आहे. कंत्राटी भरतीचे दोषी कोण? हे समोर आलं पाहिजे.यांची थोबाडं बंद झाली पाहिजेत. पहिला निर्णय 13 मार्च 2003 रोजी पहिली कंत्राटी भरती सुरू केली. त्यावेळेस सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचे होतं. शिक्षण विभागात ही भरती सुरू करण्यात आली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी कोणत्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं नाही. मात्र 13 मार्च 2003 या दरम्यान काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते. 


2) अशोक चव्हाण (Ashok Chavan)


देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही हल्ला चढवला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण असताना 2010 साली कंत्राटी भरती काढली. यामध्ये वाहन चालक, लिपिक, ऑपरेटर, मोबाईल टीचर या पदांचा यामध्ये समावेश होता, असं फडणवीस म्हणाले. शिक्षक कंत्राटी भरतीचा जीआर त्यावेळी काढण्यात आला.


3) पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)


 14 जानेवारी 2011 साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी एमसीए, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पोस्टसाठी हा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर काढण्यात आला. त्यानंतर अशाच प्रकारे जीआर 2014 साली काढण्यात आला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


4) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)


1 सप्टेंबर 2021 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कंत्राटी भरतीला यांच्या सरकारने मान्यता 2022 साली दिली. बाह्ययंत्रणेकडून गट ब, गट क पदे भरण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करणेबाबत पत्र व्यवहार केला आहे. 15 वर्षसाठी ही एजन्सी काम करणार होत्या. जास्त रेटने हे काम या एजन्सीला देण्यात आले.  आमच्या कॅबिनेटने 25 टक्यांनी रेट कमी केले. आता हे या सगळ्या विरोधात आंदोलन करतायत.लाजा वाटत नाहीत का ? हे पाप तुमचं आहे. त्यांच्या पापाचा ओझं आपल्या सरकारने का उचलायचं?आम्ही कंत्राटी पद्धतीने पद भरण्याचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता उबाठा, काँग्रेस राष्ट्रवादी हे आता माफी मागणार का ? नाहीतर आम्हाला त्यांना जनतेत उघडं करावं लागेल, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. 


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 


महाराष्ट्रमध्ये कंत्राटी भरतीसंदर्भात मुद्दाम गदारोळ उठवला जात आहे. कंत्राटी भरतीचे दोषी कोण? हे समोर आलं पाहिजे.यांची थोबाडं बंद झाली पाहिजेत. पहिला निर्णय 13 मार्च 2003 रोजी पहिली कंत्राटी भरती सुरू केली. त्यावेळेस सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचे होतं. शिक्षण विभागात ही भरती सुरू करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण असताना 2010 साली कंत्राटी भरती काढली. यामध्ये वाहन चालक, लिपिक, ऑपरेटर, मोबाईल टीचर या पदांचा यामध्ये समावेश होता. 


शिक्षक कंत्राटी भरतीचा जीआर त्यावेळी काढण्यात आला. 14 जानेवारी 2011 साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी एमसीए, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पोस्टसाठी हा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर काढण्यात आला. त्यानंतर अशाच प्रकारे जीआर 2014 साली काढण्यात आला. आज कागद जास्त आहेत त्यामुळे सगळ्यांनाचा एक्स्पोज करतो.


1 सप्टेंबर 2021 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कंत्राटी भरतीला यांच्या सरकारने मान्यता 2022 साली दिली. बाह्ययंत्रणेकडून गट ब, गट क पदे भरण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करणेबाबत पत्र व्यवहार केला आहे. 15 वर्षसाठी ही एजन्सी काम करणार होत्या. जास्त रेटने हे काम या एजन्सीला देण्यात आले.  आमच्या कॅबिनेटने 25 टक्यांनी रेट कमी केले. आता हे या सगळ्या विरोधात आंदोलन करतायत.लाजा वाटत नाहीत का ? हे पाप तुमचं आहे. त्यांच्या पापाचा ओझं आपल्या सरकारने का उचलायचं?आम्ही कंत्राटी पद्धतीने पद भरण्याचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता उबाठा, काँग्रेस राष्ट्रवादी हे आता माफी मागणार का ? नाहीतर आम्हाला त्यांना जनतेत उघडं करावं लागेल, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. 


शरद पवारांवर हल्लाबोल (Devendra Fadnavis on Sharad Pawar)


पोलीस दलात कंत्राटी भरतीबद्दल शरद पवार बोलले.3 वर्षात ठाकरे सरकारच्या काळात पोलीस भरती झाली नव्हती. आम्ही मुंबई 7 हजार पोलिसांची भरती केली.3 वर्षांची भरती एकत्र करत आहोत. ट्रेनिंगची एवढी फॅसिलिटी नसताना आम्ही तयार केली, असं देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.  


मुंबईला दशाहवादाचा धोका असतो, काही घटना घडली तर आम्ही सांगू शकत नाही पोलीस भरती केली नाही. त्यामुळे ट्रेनिंग होईपर्यत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे 3 हजार पोलीस हे मुंबईत काम करतील असा फक्त जीआर काढलाय. 3 हजार पोलिसांचा पगार मुंबई पोलीस आस्थापनेतून होईल असा हा जीआर आहे. ते म्हणताय की ही कंत्राटी भरती आहे.यांचा चेहरा आम्ही उघडा पाडला आहे, असा हल्ला फडणवीसांनी चढवला. 


आमच्या काळात कंत्राटी पद्धती झालेली नाही आमच्याकडे फक्त हे कॅबिनेटमध्ये आलं होतं. 9 कंपन्यांकडून जी भरती होणार होती ती रद्द केली आहे. फॅसिलिटी मॅनेजमेंटचा जीआर होता तो रद्द करत आहोत, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.   


Devendra Fadnavis full PC VIDEO : देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद 



 


संबंधित बातम्या