Travel : 'मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी..' या चौपाईचा अर्थ जो मंगल करतो आणि दुर्दैव दूर करतो.. तो दशरथ नंदन श्री राम, त्याचा माझ्यावर आशीर्वाद राहो. यंदा 17 एप्रिल रोजी रामनवमीचा सण साजरा होत आहे. श्री रामाच्या या विशेष उत्सवादरम्यान लोक विविध ठिकाणी मंदिरांना भेट देण्याचा विचार करत आहेत. जर तुम्ही अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर, आम्ही तुम्हाला सांगतो की, रामनवमीला अयोध्येत मोठी गर्दी होणार आहे. यावेळी सुमारे 10 लाख लोक श्रीरामाच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. अशात रामनवमीनंतर लोकांनी दर्शनासाठी यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जर तुम्ही अयोध्येला जात नसाल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास मंदिराबद्दल माहिती देत आहोत, ज्याचा श्री रामाशी खूप घनिष्ट संबंध आहे.


तामिळनाडूमध्ये श्री रामाचे अनोखे मंदिर


आपण नेहमी पाहत आलो. कोणत्याही मंदिरात श्रीरामाची मूर्ती ही धनुष्यबाण शिवाय नसते. आजपर्यंत कोणत्याही मंदिरात धनुष्यबाणाशिवाय श्रीरामाची मूर्ती  नाही. श्रीरामांची नेहमी धनुष्यबाणांनी पूजा केली जाते. मात्र तामिळनाडूतील श्री योग राम मंदिर हे एक असे मंदिर आहे. जिथे श्रीराम धनुष्यबाण शिवाय विराजमान आहेत. इतकेच नाही तर श्रीराम मंदिरात बसलेल्या स्थितीत आहेत. तुम्ही श्रीरामाची मूर्ती किंवा फोटो विकत घ्यायला गेलात तर तुम्हाला दिसेल की प्रत्येक चित्रात श्रीराम उभे आहेत. पण या मंदिरात श्री राम अत्यंत शांत अवस्थेत बसले आहेत. मंदिरात असलेल्या मूर्तीमध्ये श्रीरामाचा उजवा हात छातीवर असून डोळे मिटलेले आहेत. भगवान लक्ष्मण एका बाजूला धनुष्यबाण घेऊन उभे आहेत. तर दुसऱ्या बाजूला माता सीता आहे. असे मानले जाते की, या मंदिरात श्रीरामांनी शुक आणि अलवार ऋषींना दर्शन दिले होते. हे भारतातील श्री रामाच्या सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.


 







मंदिराला भेट देण्याची वेळ


तामिळनाडूतील श्री रामाचे हे सर्वात मोठे मंदिर आहे. मंदिर सकाळी 6 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत खुले असते. हे मंदिर सुमारे 8 एकरात पसरले आहे. 



कसे पोहोचायचे?


श्री योग रामर मंदिर तिरुवन्नमलाई शहरापासून 55 किमी अंतरावर आहे.
कोयंबेडू बस स्थानकावरून तुम्ही येथे पोहोचू शकता. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पोलूर आहे.
तुम्ही येथे विमानाने देखील येऊ शकता. यासाठी तुम्हाला चेन्नई विमानतळावर जावे लागेल.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : सुख कळले.. भारतात 'इथे' मिळेल आनंदाची अनुभूती, शांतता आणि गारवा! 'ही' अत्यंत नितळ, शांत नदी पाहिली?