पुणे : नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर तालुक्यातील (Accident) गोंडे फाटा येथे महाकाली ट्रॅव्हल्सची खासगी कम्फर्ट बस (एमएच 14 सीडब्ल्यू 9072) पुलावरून कोसळली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 34 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती वाई पोलिसांनी दिली आहे.
महाकाली ट्रॅव्हल्सची खासगी कम्फर्ट बस पुण्याहून नाशिककडे जात असताना पहाटे हा अपघात झाला. जखमी रुग्णांना सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर वावी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदेश पवार, पोलिस उपनिरीक्षक देविदास लाड, नितीन कदम यांच्यासह अन्य सहकारी व महामार्ग पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
तसेच अपघातानंतर दहा मिनिटांतच नांदूरशिंगोटे व सिन्नर येथील रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या व स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कश्यप मुकेशभाई पाठक असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे.
जखमी प्रवाशांची नावे
अब्दुल रज्जाक, सोनाली शाय, माल्टा शाय, सुधी सोनी, आश्रृध्द रेड्डी, प्रकाश कौटी, प्रियांका आलेवार, पवन पांचाळ, शुभम जाधव, भगवान इंगळे, अनिल निकमाले, मुकेश सोलंकी, शिवाजी नाळेकर, राणी कांची, अमित पांचाळ, निखिल कांदेकोरी, प्रियांशु अलवर, महेश बिडवे, तुषार मिस्त्री, पवन पावरा, राधेश्याम पावरा, रितेश भिल, बशीर चेतन सूर्यवंशी, सुरेश वाघेला, मोहम्मद अली, मेहुल प्रजापती, सोनम पवार, विवेक मिस्त्री यांचा समावेश आहे.
पुणे नाशिक महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं
पुणे नाशिक महामार्गावरील अपघाताचं प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक महामार्गावरील खेड तालुक्यातील शिरोली फाट्याजवळ भीषण अपघात झाला होता. महामार्ग ओलांडताना एका चारचाकी गाडीने धडक दिल्यानं ही घटना घडली होती. यात पाच महिलांचा मृत्यू झाला होता. 13 महिलादेखील जखमी झाल्या होत्या. एका लग्नकार्यात काम करण्यासाठी 17 ते 18 महिला स्वारगेटवरून पीएमपीएमएल बसने खेड तालुक्यात आल्या होत्या. शिरोली फाट्याजवळ त्या उतरल्या, मात्र अंधारात त्यांना महामार्ग ओलांडायचा होता. पुण्याच्या दिशेने आलेल्या चारचाकीने आधी एका महिलेला धडक दिली होती. त्यानंतर गाडीवरचा ताबा सुटला आणि इतर सात महिलांना ही त्याने धडक दिली होती. यात दुर्दैवाने पाच महिलांना जीव गमवावा लागला होता.
इतर महत्वाची बातमी-