Monsoon Travel : पाऊस म्हणजे प्रेम.. पाऊस म्हणजे निसर्ग... पाऊस म्हणजे गारवा...पाऊस म्हणजे तू... पाऊस म्हणजे मी...पावसात मनातले सर्व रंग उधळून द्यावे...आणि मनमुराद जगावं.. प्रत्येक निसर्गप्रेमी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. एकदा पाऊस आला की वातावरणात क्षणात बदल होतो...आणि अचानक गारवा जाणवू लागतो...चोहीकडे हिरवंगार निसर्ग... पावसाळ्यात प्रवास करणे अनेकांना आवडते. कारण या ऋतूत तुम्ही कोठेही जाल तरी तुम्हाला सर्वत्र हिरवळ आणि थंडगार वारा जाणवतो. अशाच निसर्गप्रेमींसाठी भारतीय रेल्वेने खास टूर पॅकेज आणले आहे. जाणून घ्या..


 


मान्सून पिकनिकसाठी भारतीय रेल्वेची विविध टूर पॅकेजेस


हिरवागार निसर्ग पाहण्याची संधी फक्त पावसाळ्यातच मिळते. देशात पावसाळ्यात भेट देण्यासारखी अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथले नजारे तुम्हाला भुरळ घालतील. यासाठी तुम्हाला परदेशात जाण्याची गरज नाही. पण या ऋतूत प्रवास करणे थोडे कठीण होते. कारण प्रवास करताना तुम्हाला प्रत्येक सुविधेची विशेष काळजी घ्यावी लागते. जसे की तुम्हाला आगाऊ हॉटेल बुक करावे लागते. पावसात अडकू नये म्हणून अंधार पडण्याआधी हॉटेल गाठावे लागते. याशिवाय, तुम्ही स्कूटी किंवा बाईकवर प्रवास करू शकत नाही, कारण भिजल्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. अशा लोकांसाठी भारतीय रेल्वेने विविध टूर पॅकेजेस आणली आहेत. या पॅकेजमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील.




ओडिशा टूर पॅकेज


सध्या ओडिशाच्या अनेक भागात मान्सून दाखल झाला आहे. पावसाळ्यात येथील दृश्य आणखीनच सुंदर बनते.
या पॅकेजद्वारे तुम्ही सप्टेंबरपर्यंत प्रवास करू शकता. तुम्ही जून ते सप्टेंबर दरम्यान कधीही सहलीची योजना करू शकता.
पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला भुवनेश्वर, चिल्का, कोणार्क आणि पुरी येथे जाण्याची संधी मिळेल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 18045 आहे.
मुलांसाठी तुम्हाला 6805 रुपये वेगळे द्यावे लागतील.
तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करू शकता.




नैनिताल टूर पॅकेज


हे पॅकेज दिल्लीपासून सुरू होत आहे.
हे 2 रात्री आणि 3 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
पॅकेजमध्ये हॉटेल आणि प्रवासाचा खर्च समाविष्ट आहे.
यामध्ये 2 लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 25000 रुपये आहे.
मुलांसाठी तुम्हाला 23000 रुपये द्यावे लागतील.
भारतातील पावसाळ्यात भेट देण्यासारखे हे एक सुंदर ठिकाण आहे.
तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करू शकता.




दार्जिलिंग, गंगटोक आणि कालिम्पाँग टूर पॅकेज


हे पॅकेज 1 जुलैपासून सुरू होत आहे.
यामध्ये तुम्हाला 5 रात्री आणि 5 दिवस फिरण्याची संधी मिळणार आहे.
या पॅकेजमध्ये, दोन लोकांसोबत प्रवास करणाऱ्या प्रति व्यक्ती पॅकेज फी 29,600 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 8,750 रुपये आहे.


 


टीप : अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या www.irctctourism.com या वेबसाईटवर जाऊ शकता. 


 


हेही वाचा>>>


Travel : तिरुपती..उज्जैन..लडाख..भारतीय रेल्वेकडून जुलै-ऑगस्टमध्ये फिरण्याची संधी! किती खर्च येईल? जाणून घ्या 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )