Surya Grahan 2024: ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहणाला ( Solar Eclipse) फार महत्त्व आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात. लवकरच आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. या ग्रहणाच्या बाबतीत बोलायचे तर हे ग्रहण 21 व्या  शतकातील सर्वात मोठे  ग्रहण असणार आहे.   हे ग्रहण  तब्बल 6 तास 4 मिनिटे असणार आहे.विशेष म्हणजे  सूर्य ग्रहणाच्या दरम्यान रिंग ऑफ फायरचा नजारा जवळपास सात मिनिटे पाहायला मिळणार आहे.


पंचांगानुसार 2024 मध्ये हे दुसरे सूर्य ग्रहण 2 ऑक्टोबरला बुधवारी होणार आहे. भारतीय वेळेनुसार  हे सूर्यग्रहण दुपारी 3 वाजून 42 मिनिटानी सुरु होणार असून रात्री 9 वाजून 47 मिनिटापर्यंत असणार आहे.   हे सूर्यग्रहण 'रिंग ऑफ फायर' अर्थात आगीचे सुवर्णकड्याच्या रुपात दिसणार असल्याने लोकांमध्ये उत्साही आहे.   सूर्यग्रहण हे या वर्षाचे शेवटचे ग्रहण आहे. हे या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असल्याचेही सांगितले जात आहे. एक चमकणारे कडे, किंवा अंगठी दिसते. याला रिंग ऑफ फायर असे म्हणतात. 


भारतात दिसणार का सूर्यग्रहण?


वर्षाचे शेवटते सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. वर्षतील पिहले सूर्यग्रहण देखील भारतात दिसले नव्हते. हे सूर्य ग्रहण दक्षिण अमेरिका, अर्जेंटिना, प्रशांत महासागर, फिजी आणि पेरुमध्ये दिसणार आहे.  


सूतक पाळायचे का?


भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही त्यामुळे  सूतक काळाचा कोणताही प्रभाव पडणार आहे. शास्त्रात सूतक काळा हा चांगला मानला जात नाही. सूतक काळात कोणतेही शुभ कार्य करत नाही. सूर्यग्रहणाच्या 12 तास अगोदर सूतक काळ सुरू होतो. दुसऱ्या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 2 ऑक्टोबरला सकाळी 9.13 वाजता सुरू होईल.


सूर्यग्रहणात काय करावे?


सूर्यग्रहण भारतात जरी दिसत नसले तरी इतर देशात हे ग्रहण दिसणार आहे.  सूर्यग्रहणाचा सुतक काळ आणि सूर्यग्रहण भारतात  दिसणार नाही. मात्र सावधगिरी बाळगण्यासाठी सुतक काळात किंवा ग्रहण काळात काही मंत्रांचा जप करू शकता. या मंत्रांचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि ग्रहण दोषांपासून मुक्ती मिळते.



  • ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ

  • ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः

  • ॐ सूर्याय नम:

  •  ॐ घृणि सूर्याय नम:

  •  ॐ हिरण्यगर्भाय नम: 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हे ही वाचा :


अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतात 'या' राशींचे जोडीदार, दुधात साखरेसारखे असतात परफेक्ट मॅच