Travel : जून महिन्यात पावसाळा सुरू झाला असल्याने देशातील विविध भागात एक आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे. मुलांच्या शाळा सुरू झाल्यामुळे किंवा इतर कामांमुळे जर तुम्हाला जूनमध्ये कुठेही प्रवास करता आला नसेल, निराश होऊ नका.. जुलै आणि ऑगस्टच्या विविध टूर पॅकेजमधून प्रवास करण्याचा प्लॅन करा. यासाठी आयआरसीटीसीने एक उत्तम पॅकेज आणले आहे. या पॅकेजनुसार तुम्हाला 3 ते 4 दिवस प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. अनेक पॅकेजेसमध्ये तुम्ही अगदी 1 आठवड्यासाठी प्रवास करू शकता. तुम्ही ही सहल वीकेंडला सुरू करू शकता. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला या पॅकेजेसबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.




तिरुपती टूर पॅकेज


हे पॅकेज 2 जुलैपासून सुरू होणार आहे.
हे 1 रात्र आणि 2 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रेन आणि कॅबने प्रवास करण्याची संधी मिळेल.
पॅकेज फी - तीन लोकांसह प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 7,300 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 5,720 रुपये आहे.





चेन्नई ते लडाख टूर पॅकेज


हे पॅकेज 11 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
पॅकेज 6 रात्री आणि 7 दिवसांसाठी आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइट आणि कॅबने प्रवास करण्याची संधी मिळेल.
पॅकेज फी - तीन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 52,500 रुपये आहे.
मुलांसाठीही तुम्हाला 46,000 रुपये वेगळे शुल्क भरावे लागेल.






महेश्वर, ओंकारेश्वर आणि उज्जैन टूर पॅकेज


हे पॅकेज 7 ऑगस्टपासून हैदराबादपासून सुरू होणार आहे.
हे 4 रात्री आणि 5 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइट आणि कॅबने प्रवास करण्याची संधी मिळेल.
पॅकेज फी - तीन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 25350 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 16500 रुपये आहे.
तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करू शकता.





प्रयागराज, सारनाथ आणि वाराणसी टूर पॅकेज


हे पॅकेज 20 जुलैपासून सुरू होत आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइट आणि बसने प्रवास करण्याची संधी मिळेल.
हे 5 रात्री आणि 6 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
पॅकेज फी - तीन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 29850 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 17400 रुपये आहे.


 


टीप : अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या www.irctctourism.com या वेबसाईटवर जाऊ शकता. 


 


हेही वाचा>>>


Travel : Weekend आहे खास, सोबत बहरलेला निसर्ग! पावसात महाराष्ट्रातील 'हे' धबधबे फिरायला विसरू नका


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )